BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी घेतली NCA प्रमुख आणि जुना साथी राहुल द्रविड याची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
सौरव गांगुली आणि राहुल द्रविड (Photo Credits Facebook)

बीसीसीआयचे (BCCI) निर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी काल नॅशनल क्रिकेट अकादमीचे (NCA) प्रमुख आणि त्यांचे जुने क्रिकेटचे सहकारी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची भेट घेतली. बातमीनुसार, या बैठकीनंतर वर्षानुवर्षे भारतीय क्रिकेटची 'सप्लाय लाइन' असणारी अकादमीच्या सुधारण्यासाठी या दोघांमध्ये चर्चा झाली. भारतासाठी एकत्र खेळलेल्या या दोन दिग्गज क्रिकेटपटूनि अकादमीबद्दल चर्चा केली. सौरव आणि द्रविड यांनी एकत्र टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. गांगुली आणि द्रविड यांनी पहिला टेस्ट सामना जुन 1996 मध्ये इंग्लंड (England) विरुद्ध खेळला होता. गांगुली यांनीही आपले मत व्यक्त केले. एनसीएची नवीन अकादमी जिथे तयार होणार आहे त्या प्रस्तावित जागेचीही त्यांनी तपासणी केली. बीसीसीआयने मे महिन्यात 25 एकर भूखंडासाठी कर्नाटक सरकारशी करार केला होता आणि आता बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सेंटर ऑफ एक्सलन्स तयार करण्यासाठी त्यांना अतिरिक्त 15 एकर जागा मिळाली आहे. (ईडन गार्डन्सवर खेळला जाणार भारतातील पहिला Day-Night कसोटी सामना; जाणून घ्या तिकिटांचे दर आणि इतर माहिती)

एकीकडे, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीबद्दल प्रश्न उपस्थित होत असताना गांगुली आणि द्रविड यांच्यातील बैठक महत्त्वाची मानली जात होती. टीम इंडियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या अध्यक्षतेखालील नॅशनल क्रिकेट अकादमीवर खेळाडूंची दुखापत आणि त्यांच्या  पुनर्प्राप्तीसाठी विलंबामुळे एनसीएवर टीका केली जात आहे. आता नुकताच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याची घटना समोर येत आहे. भुवीला फिट नसल्यामुळे बांग्लादेशविरुद्ध टी-२० मालिकेच्या संघात स्थान मिळाले नाही. रिद्धिमान साहा यांची दुखापत आणि पृथ्वी शॉ याच्या डोप टेस्ट प्रकरणातही राष्ट्रीय क्रिकेट अकादमीवरही आरोप करण्यात आला आहे. रिहॅबिलिटेशनदरम्यान साहाच्या खांद्याची दुखापत आणखीनच खराब झाली ज्यामुळे त्याला शस्त्रक्रियेसाठी इंग्लंडला जावे लागले. यामुळे साहा दीड वर्ष कसोटी संघातून बाहेर राहिला.

दरम्यान, गांगुलीने बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळल्यानंतर म्हणाले होते की देशांतर्गत क्रिकेट आणि प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंची परिस्थिती सुधारली जाईल. शिवाय, गांगुली भारतीय बोर्डाचे प्रमुख झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत बीसीसीआयची काय स्थिती असेल हे पाहण्याची उत्सुकतेचे ठरेल. आयसीसीमधील बीसीसीआय प्रतिनिधी म्हणून एन श्रीनिवासन सोडल्यापासून आयसीसी सतत बीसीसीआयच्या विरोधात काहीतरी करत राहिली आहे.