टीम इंडिया (Photo Credit: IANS)

भारत आणि न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship Final 2021) अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे खेळला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या या एतिहासिक सामन्याची सर्व क्रिकेट विश्वाला प्रचंड उत्सुकता लागली आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारत न्यूझीलंडच्या संघाविरुद्ध लढणार आहे. या महत्वाच्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या सामन्यात कोणकोणत्या खेळाडूला संधी मिळाली हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना उद्यापासून (17 जून 2021) सुरु होत असून भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने आहेत. या सामन्यामध्ये भारताकडून कोणत्या 11 खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल, याविषयी बरीच चर्चा सुरू होती. अखेर बीसीसीआयने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. त्यानुसार, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शामी हे 11 खेळाडू न्यूझीलंडच्या संघाला टक्कर देणार आहेत. हे देखील वाचा- IND (W) vs ENG (W) 1st Test Day 1: कर्णधार हीथर नाईट आणि टॅमी ब्युमॉन्टची अर्धशतकीय खेळी, इंग्लंडच्या पहिल्या दिवसाअखेर 6 बाद 269 धावा

बीसीसीआयचे ट्वीट-

दरम्यान, रोज बाऊल मैदानात आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी 3 सामन्याचा निकाल लागला आहे. तर, 3 सामने ड्रॉ झाले आहेत. या मैदानात गोलंदाजांनी एकूण 161 विकेट्स घेतले आहेत. यात 120 विकेट्स वेगवान गोलंदाजांच्या नावावर आहेत. तर, फिरकीपटूंनी 41 विकेट्स पटकावले आहेत. या मैदानात वेगवाग आणि फिरकी गोलंदाजांनी पाच-पाच वेळा 5 हून अधिक विकेट्स घेतले आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आकडेवारी संदर्भात बोलायचे झाले तर, भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 59 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी भारतीय संघाने 21 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, न्यूझीलंडच्या संघाने केवळ 12 सामन्यात भारताला पराभूत केले आहे.