BBL 2022: आयपीएल लिलावापूर्वी 32 वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडूने केला कहर, T20 सामन्यात ‘दुहेरी हॅटट्रिक’ घेत केली कमाल (Watch Video)
कॅमरून बॉयस BBL दुहेरी हॅटट्रिक (Photo Credit: Twitter/BBL)

बिग बॅश लीग (Big Bash League) 2021-22 मध्ये बुधवारी सिडनी थंडरचा (Sydney Thrunders) सामना मेलबर्न रेनेगेड्सशी (Melbourne Renegades) होणार झाला. या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्सचा लेगस्पिनर कॅमरून बॉयसने (Cameron Boyce) फलंदाजांची तारांबळ उडवली. त्याने चार चेंडूत चार विकेट घेत लीगमध्ये इतिहास रचला. याशिवाय बीबीएलमध्ये ‘दुहेरी हॅटट्रिक’ (BBL Double Hat trick) घेणारा बॉयस पहिला खेळाडू ठरला. या लेगस्पिनरने सामन्यात एकूण पाच विकेट घेतल्या. बॉयसच्या या कामगिरीनंतरही त्याच्या संघाला मात्र एका धावेने पराभवाला सामोरे जावे लागले. 32 वर्षीय बॉयसने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) दोन षटकांत सिडनी थंडरच्या टॉप ऑर्डरला उद्ध्वस्त करताना चार विकेट घेतल्या. त्याने सातव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कहर करायला सुरुवात केली आणि सलामीवीर अ‍ॅलेक्स हेल्सला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. (BBL 2021-22: 100 व्या बिग बॅश सामन्यात Glenn Maxwell याचा शतकी धमाका, मेलबर्न स्टार्ससाठी ठोकली रेकॉर्ड-ब्रेक सेंच्युरी)

त्यानंतर नवव्या षटकात बॉयस गोलंदाजीवर परतला आणि पहिल्या चेंडूवर जेसन संघाला पॅव्हिलियनमध्ये पाठवले. बॉयसच्या पुढच्याच चेंडूवर अ‍ॅलेक्स रॉस एलबीडब्ल्यू होऊन तंबूत परतला. त्याने डॅनियल सॅम्सला बाद करून  हॅटट्रिक पूर्ण केली. अ‍ॅलेक्स रॉस आणि डॅनियल सॅम्स यांना खातेही उघडता आले नाही. रॉसला बाद करून हॅटट्रिक घेणारा बॉयस बीबीएल स्पर्धेतील आठवा खेळाडू ठरला. तर सॅम्सला बाद करून त्याने चार चेंडूत चार विकेट घेतल्या. चार चेंडूत चार गडी बाद करणारा तो स्पर्धेच्या इतिहासातील पहिला गोलंदाज ठरला. अशी कामगिरी करणारा बॉयस हा T20 इतिहासातील 10वा गोलंदाज ठरला आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकात आयर्लंडच्या कर्टिस कॅम्परने चार चेंडूत चार विकेट घेतल्या होत्या.

सामन्याबद्द बोलायचे तर हेल्स आणि ख्वाजा या जोडीने थंडरला खेळात दमदार सुरुवात केली पण बॉयसच्या चार विकेटने सामन्याचे चित्र बदलले. बॉयसने रेनेगेड्सला सलामीला यश मिळवून देण्यापूर्वी या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली होती. इंग्लंडच्या फलंदाजाने बॉईसचा चेंडू लाँग ऑफच्या दिशेने उंचावला आणि पोझिशनवर उन्मुक्त चंदकडे सोपा झेल दिला. योगायोगाने, बॉयसने त्याच्या पुढच्या षटकात थंडरचा यष्टिरक्षक-फलंदाज मॅथ्यू गिल्केसला 2 धावांवर बाद करून पाच विकेटही पूर्ण केल्या.