Syed Mushtaq Ali Trophy 2021 Final: सेम टू सेम धोनी! विष्णू सोलंकीने मारलेल्या हॅलिकॉप्टर शॉटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा; पाहा व्हिडिओ
Syed Mushtaq Ali Trophy 2021 (Photo Credit: BCCI)

सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात (Syed Mushtaq Ali Trophy 2021 Final) तामिळनाडूच्या (Tamil Nadu) संघाने सात विकेट्स राखून बरोदाच्या (Baroda) संघाला पराभूत केले आहे. या विजयासह तामिळनाडूच्या संघाने दुसऱ्यांदा हा खिताब जिंकला आहे. या स्पर्धेत तामिळनाडूच्या संघाने दाखवलेल्या कामिगिरीचे सर्व स्तरावरून कौतूक होत आहे. याचबरोबर बरोदा संघाचा फलंदाज विष्णू सोलंकीने (Vishnu Solanki) या स्पर्धेत मारलेल्या हॅलिकॉप्टर शॉटची (Helicopter Shot) अधिक चर्चा रंगली आहे. त्याने मारलेल्या हा शॉट चाहत्यांना भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची (MS Dhoni) आठवण आली आहे.

सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बरोदाच्या संघाला पराभावाचा सामना करावा लागला. मात्र, या सामन्यात 49 धावांची खेळी करणारा विष्णु सोलंकी सर्वांच्याच लक्षात राहिला आहे. या खेळीदरम्यान सोलंकीने अनेक आकर्षक फटकेबाजी केली. परंतु, त्याने मारलेले हॅलिकॉपर शॉट चर्चेचा विषय ठरत आहे. 28 वर्षीय सोळंकीवर आयपीएल लिलावात मोठी बोली लागेल, अशी अपेक्षा आहे. हे देखील वाचा- MS Dhoni याची मुलगी Ziva हिने आपल्या फार्महाऊसमध्ये लावले भाजी मार्केट, आई साक्षी सिंह धोनीने Cute व्हिडिओतून दाखवली झलक

व्हिडिओ-

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत बरोदा हार्दिक पंडया, कृणाल पांडया आणि दिपक हुडा यांच्या अनुपस्थितीत खेळली. केदार देवधरच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या या संघाने अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. देवधरने आपल्या बॅटींगच्या माध्यमातून तर भार्गव भट्ट आणि कार्तिक काकडे यांनी फिरकीच्या जोरावर बडोद्याला फायनलमध्ये पोहोचवले. मात्र, फायनलमध्ये तामिळनाडूच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे बरोदाच्या संघाने गुडघे टेकले. अखेर या सामन्यात बरोदाच्या संघाला पराभवाच्या सामोरे जावा लागले.