चायनाच्या 'Oppo' ऐवजी ही Byju's असणार टीम इंडियाचा मुख्य प्रायोजक, बीसीसीआयला देणार इतके करोड रुपये
टीम इंडिया (Photo Credits: IANS)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघात (Indian Team) मोठे बदल करण्यात येणार आहे. बीसीसीआय (BCCI) सध्या नवीन मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफच्या शोधात आहे. त्यासाठी त्यांनी 31 जुलैपर्यंत अर्ज देखील मागवले आहे. आणि आता भारतीय संघात अजून एक बदल होणार आहे आणि तो म्हणजे टीम इंडियाचे प्रायोजक. टीम इंडियाच्या जर्सीवर ओप्पो (Oppo) ऐवजी नवीन ब्रँडचे नाव असेल. चिनी मोबाईल निर्माते ओप्पो हे आता टीम इंडियाचे प्रायोजक राहणार नाही. त्यांच्या ऐवजी बाईजू (Buju's), बंगलोरस्थित शैक्षणिक तंत्रज्ञान आणि ऑनलाइन शिक्षण संस्था घेणार आहे. ओप्पोने 2017 मध्ये टीम इंडियाचे प्रायोजक म्हणून मिळवला होता. त्या वेळी ओप्पोचा भारतीय संघाचा प्रायोजक होण्याने लोकांमध्ये संताप निर्माण झाला होता. भारत आणि चीन यांच्यात स्पर्धा आहे आणि अशा परिस्थितीत चिनी कंपनीच्या टीम इंडियाचे प्रायोजक अधिग्रहणाबद्दल प्रश्न निर्माण केले गेले आहेत. (टीम इंडियाच्या फील्डिंग कोच पदासाठी क्रिकेटविश्वातील या दिग्गज खेळाडूने केला अर्ज)

सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार ओप्पोने टीम इंडियाचा प्रायोजक म्हणून बाहेर पडण्याचा आणि त्यांचा हा अधिकार बाईजू ला देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय त्यांनी तो बीसीसीआय अधिकाऱ्यांना देखील सांगितला आहे. ओप्पोने माघार घेण्याचे कारण म्हणजे 2017 मध्ये त्यांनी जेवढी किंमत देऊन ती प्रायोजकता मिळवली होती ती त्यांना आता 'अशक्य' आणि 'अत्यंत जास्त' वाटत आहे. बीसीसीआयने यासाठी कोणत्याही लिलाव प्रक्रियेची सुरूवात केली नाही. परंतु ओप्पोने स्वत:च हे अधिकार बाईजू कंपनीला दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच क्रिकेट विश्वचषकनंतर ही गोष्ट घडल्याचे म्हटले जात आहे. आणि वेस्ट इंडीज मालिकेच्या अखेरीपर्यंत 'ओप्पो' टीम इंडियाच्या जर्सीवर पाहिले जाईल. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाईजूकडून बीसीसीआयला समान रक्कम मिळत राहील आणि तांत्रिकदृष्ट्या हा करार 31 मार्च 2022 पर्यंत चालणार.

दरम्यान, ओप्पोने मार्च 2017 मध्ये 1079 कोटी रुपये देत 5 वर्षांसाठी प्रायोजकत्वाचे अधिकार मिळविले होते. ओप्पो सध्या भारताच्या प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला 4.61 कोटी रुपये देते. तर आयसीसी किंवा एशियन क्रिकेट कौन्सिलच्या खेळासाठी 1.56 कोटी रूपये आहेत. महत्वाचे म्हणजे ही सर्वात मोठी प्रायोजक रक्कम आहे. यापूर्वी, सहारा इंडिया 2012-13 मध्ये 3.34 कोटी रुपये देत होते.