Bangladesh Women's Under-19 Team vs Nepal Women's Under-19 Team Match Scorecard: आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक 2025 च्या चौथ्या सामन्यात, बांगलादेश महिला अंडर-19 संघाने नेपाळ महिला अंडर-19 संघाचा 5 गडी राखून पराभव करून शानदार विजय मिळवला. हा सामना शनिवार, 18 जानेवारी 2025 रोजी बांगी येथील यूटीडी-यूकेएम क्रिकेट ओव्हल येथे खेळवण्यात आला. या विजयासह बांगलादेशने स्पर्धेत आपले खाते उघडले आहे, तर नेपाळला पुढील सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल. (हे देखील वाचा: ICC U19 Women's T20 World Cup Live Streaming: आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाला आजपासून सुरुवात, भारतात कधी अन् कुठे घेणार थेट सामन्याचा आनंद; घ्या जाणून)
ICC Women's Under-19 T20 World Cup, 2025
Bangladesh U19 Vs Nepal U19 | Malaysia
Bangladesh won the match by 5 wickets 🇧🇩 👏
PC: ICC/Getty
Match Details: https://t.co/JGMWg6HcFg#BCB #Cricket #Bangladesh #U19WorldCup #T20 #Womenscricket pic.twitter.com/YGW6kU27Qz
— Bangladesh Cricket (@BCBtigers) January 18, 2025
नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण बांगलादेशच्या धारदार गोलंदाजीसमोर त्यांचा डाव डळमळीत झाला. संपूर्ण नेपाळ संघ 18.2 षटकांत फक्त 52 धावांवर ऑलआउट झाला. नेपाळकडून सना प्रवीणने 32 चेंडूत 19 धावा केल्या तर इतर कोणताही फलंदाज सातत्यपूर्ण खेळू शकला नाही. बांगलादेशकडून जन्नतुल माओआने 4 षटकांत 11 धावा देत 2 बळी घेतले. त्यांच्याशिवाय, मस्त अनीसा अख्तर सोबा आणि फहोमिदा चोया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
52 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. तीन विकेट लवकर गमावल्यानंतर संघावर दबाव होता पण सादिया इस्लाम (16 धावा) आणि कर्णधार सुमैया अख्तर (12 धावा) यांनी डाव सावरला. शेवटी, आफिया आशिमा एरा नाबाद 9 धावा करून बांगलादेशला 13.2 षटकांत विजय मिळवून दिला. नेपाळकडून रचना चौधरी, रिया शर्मा, सीमाना केसी आणि पूजा महातो यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.