Najmul Hossain Shanto (Photo Credit - X)

Nazmul Hussain Shanto: बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया (Team India) आता 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी सज्ज (IND vs BAN T20I Series 2024) झाली आहे. पहिला सामना 6 ऑक्टोबरला होणार आहे. भारतीय संघाला सूर्यकुमार यादवच्या (SuryaKumar Yadav) नेतृत्वाखाली टी-20 मालिकेत सहभागी व्हायचे आहे. ग्वाल्हेर येथे होणाऱ्या या सामन्यापूर्वी बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतोने (Nazmul Hussain Shanto) भारतीय संघाला आव्हान दिले आहे. त्याने आपल्या पत्रकार परिषदेत एक मोठी गोष्ट सांगितली असून मालिका जिंकण्याचा दावाही केला आहे.

नजमुल हुसैन शांतोचे मोठे वक्तव्य

आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना शांतो म्हणाला की, आम्हाला टी-20 मालिका जिंकायची आहे. आम्हाला आक्रमक क्रिकेट खेळायचे आहे. वर्ल्डकपच्या आठवणी सांगताना तो म्हणाला की, मेगा स्पर्धेत आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. आम्हाला उपांत्य फेरी गाठण्याची चांगली संधी होती. जरी आम्ही तिथे चुकलो. पण यावेळी आमच्याकडे नवीन टीम आहे. कसोटी मालिका विसरून टी-20 मालिकेत प्रवेश करणार असल्याचेही त्याने सांगितले. (हे देखील वाचा: IND vs BAN T20I Series 2024: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादव करणार मोठा पराक्रम, 'या' दोन दिग्गजांचा विक्रम काढणार मोडीत)

'जो चांगला खेळणार तो जिंकणार'

याशिवाय कसोटी क्रिकेटमधील आमची खराब कामगिरी विसरून मैदानावर उतरायला आम्हाला आवडेल, असेही शांतोने कबूल केले. टी-20 हा पूर्णपणे वेगळा खेळ आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. जो सामन्यात चांगला खेळेल तो सामना जिंकेल. भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेसाठी दोन्ही संघात युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मंयक यादव

बांगलादेश संघ

नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तनजीद हसन तमीम, परवेझ हुसैन इमोन, तौहीद हृदयॉय, महमूद उल्लाह, लिटन कुमार दास, झेकर अली अनिक, मेहदी हसन मिराज, शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, तस्किन अहमद. हसन साकिब, रकीबुल हसन.