SuryaKumar Yadav: कसोटी मालिकेत बांगलादेशला (Bangladesh) क्लीन स्वीप केल्यानंतर टीम इंडियाची (Team India) नजर आता टी-20 मालिकेवर (T20 Series) आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरमध्ये खेळवला जाईल. या सामन्यात टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या (SuryaKumar Yadav) हाती आहे. या सामन्यात त्याला अनेक मोठे पराक्रम करण्याची संधी आहे. सूर्यकुमार यादव टी-20 फॉरमॅटमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अशा स्थितीत त्याला बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात धडाकेबाज कामगिरी करण्याची संधी आहे. (हे देखील वाचा: IND VS BAN T20I Series 2024: भारत विरुद्ध बांगलादेश टी20 मालिकेपूर्वी पहा हेड टू हेड रेकॉर्ड, सर्वाधिक धावा करणारा फलंदाज, सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज यासह सर्व तपशील घ्या जाणून)
सूर्यकुमार यादव करू शकतो 'हा' मोठा पराक्रम
या सामन्यात सूर्यकुमार यादवला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात धावांच्या बाबतीत शोएब मलिकला मागे टाकण्याची संधी आहे. सूर्यकुमार यादवने 71 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2432 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने आपल्या कारकिर्दीत चार शतके आणि 20 अर्धशतके झळकावली आहेत. तर, शोएब मलिकने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 124 सामने खेळून 2435 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत शोएब मलिकच्या पुढे जाण्यासाठी सूर्यकुमार यादवला केवळ 4 धावा कराव्या लागतील.
डेव्हिड मिलरल टाकू शकतो मागे
याशिवाय डेव्हिड टी-20 इंटरनॅशनलमध्ये धावांच्या बाबतीत मिलानला मागे टाकू शकतो. डेव्हिड मिलरने आतापर्यंत 125 सामने खेळून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2437 धावा केल्या आहेत. त्याला मागे टाकण्यासाठी सूर्यकुमार यादवला केवळ 6 धावा कराव्या लागतील.
कर्णधारपदात सूर्याचा विक्रम राहिला अतिशय उत्कृष्ट
सूर्यकुमार यादवने 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. यापैकी त्याने 7 सामने जिंकले आहेत. यापैकी दोन सामन्यांत त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याच वेळी, एक सामना बरोबरीत आहे.
बांगलादेशविरुद्ध कसा आहे भारताचा विक्रम
तर, भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 सामन्याच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही देशांमध्ये 14 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने 13 सामने जिंकले आहेत. भारताला एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. बांगलादेशला टी-20 मालिकेत कसोटी सामन्यातील पराभवाचा बदला नक्कीच घ्यायला आवडेल.