BAN vs AFG 1st Test: राशिद खान याने कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात केला 'हा' विक्रम, शाकिब अल हसन याला पछाडत केला वर्ल्ड रेकॉर्ड
राशिद खान (Photo Credit: PTI)

अफगाणिस्तानचा (Afghanistan) फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan) याच्यासाठी बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध पहिला टेस्ट सामना संस्मरणीय बनला आहे. बांगलादेशविरुद्ध टेस्ट मालिकेने राशिदने टेस्टमध्ये पहिल्यांदा कर्णधार पद सांभाळले आहे. 20 वर्षीय फिरकीपटूने पहिल्या सामन्यात आपल्या फलंदाजीने सर्वांना चकित केले, त्याचवेळी त्याने गोलंदाजीतही आश्चर्यकारक प्रदर्शन केले. कर्णधारपदी पदार्पण सामन्यात रशीदने त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या डावात 5 विकेट आणि 50 धावा केल्या आणि एका अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. एकाच डावात 5 विकेट आणि 50 धावा घेणार राशिद जगातील फक्त चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. पहिल्या कसोटीत त्याने बांगलादेशविरूद्ध हा पराक्रम केला. (लसिथ मलिंगा याने हॅट्रिकसह 4 चेंडूत घेतल्या 4 विकेट्स, T20 च्या सामन्यात रचला इतिहास)

अफगाणिस्तानचा प्रतिस्पर्धी नईम हसन याला बाद करून रशीदने पराक्रम केला. राशिदने 19 ओव्हरमध्ये 55 धावा देत 5 गडी बाद केले. अफगाणिस्तानच्या पहिल्या डावात रशीदने 61 चेंडूत 51 धावा केल्या आणि यामुळे अफगाण संघाला 342 धावांपर्यंत मजल मारता आली. या खेळीत 3 षटकारांचादेखील समावेश होता. दरम्यान, राशिदच्या आधी इंग्लंडचा माजी कर्णधार शेल्डन जॅक्सन आणि पाकिस्तानचा दिग्गज इमरान खान आणि बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन यांनी ही कामगिरी बजावली होती. कर्णधारपदी पदार्पण करताना तिघांनीही अशी आश्चर्यकारक कामगिरी केली होती. दुसरीकडे, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात युवा कर्णधार बनलेल्या रशीदने बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिबला 'हा' विक्रम करण्यात पिछाडीवर टाकले आहे. रशीदने 20 वर्ष आणि 352 दिवसांत हा पराक्रम केला तर शाकिबने 22 वर्ष आणि 115 दिवसात हा विक्रम केला होता.

कसोटी सामन्यात राशिदने दुसऱ्यांदा 5 विकेटची नोंद केली आहे. यापूर्वी त्याने आयर्लंडविरूद्ध हा पराक्रम केला होता. दरम्यान, चटगाँव येथे सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात, रशीदच्या प्रयत्नांमुळे अफगाणिस्तानने बांगलादेशला पहिल्या डावात 205 धावांवर रोखले आणि त्यामुळे अफगाणिस्तानला 137 धावांची आघाडी मिळाली. पण, अफगाणिस्तानच्या दुसर्‍या डावाची सुरुवात काही चांगली झाली नाही. शकिबने डावाच्या पहिल्याच षटकात इहसानुल्ला 4 आणि पहिला डावातील शतकवीर रहमत शहा याला 0 धावांवर सलग चेंडूंत बाद केले. 15 व्या षटकात अफगाणिस्तानला पुन्हा धक्का बसला, जेव्हा नईम हसनने हशमतुल्लाह शाहीदी याला 12 धावांवर बाद केले आणि अफगाणिस्तानची अवस्था 3 बाद 28 धावा अशी झाली.