Opening Ceremony (Photo Credit - Twitter)

एकदिवसीय विश्वचषक (ICC Cricket World Cup 2023) यंदा भारतात (India) खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड (NZ vs ENG) यांच्यात 5 ऑक्टोबर म्हणजे उद्या खेळवला जाणार आहे. विश्वचषकापूर्वी उद्घाटन सोहळ्याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे, ज्यामुळे चाहत्यांची निराशा होऊ शकते. खरे तर असे मानले जात होते की 04 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड कपचा उद्घाटन सोहळा आयोजित केला जाणा होता पण आता नवीन अपडेटनुसार यावेळी उद्घाटन सोहळा आयोजित केला जाणार नाही. (हे देखील वाचा: IND vs PAK Final 2023: विश्वचषकाच्या आधी 7 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान होवू शकतो अंतिम सामना, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण)

समारंभाच्या संदर्भात ही योजना होती

विश्वचषक सुरू होण्यापूर्वी ज्या उद्घाटन सोहळ्याची चर्चा होत होती त्यानुसार या सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक स्टार्स परफॉर्म करणार होते. हा सोहळा सायंकाळी 7 वाजता सुरू होणार होता. पण आता विश्वचषक सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत आणि बीसीसीआय आणि आयसीसीकडून उद्घाटन सोहळ्याबाबत कोणतीही अपडेट आलेली नाही. अशा स्थितीत चाहत्यांची यामुळे निराशा झाली आहे. मात्र, 4 ऑक्टोबर रोजी सर्व संघांचे कर्णधार ट्रॉफीसोबत फोटो सेशनसाठी अहमदाबादमध्ये उपस्थिती लावली आहे.

हा विश्वचषक अनेक अडचणींनी घेरला आहे

यंदाचा एकदिवसीय विश्वचषक सुरुवातीपासूनच अडचणींनी घेरला आहे. सर्वप्रथम, आयसीसीने वेळापत्रक उशिरा जाहीर केल्याने आणि त्यात पुन्हा बदल केल्याबद्दल चाहत्यांनी आधीच टीका केली होती. आयसीसीच्या या कारवाईमुळे चाहत्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. आयसीसी उद्घाटन सोहळ्याऐवजी समारोप समारंभ आयोजित करू शकते, असे मानले जात आहे. भारत-पाकिस्तान सामन्याआधीच काहीतरी खास प्लॅनिंग करण्यात येत असल्याचंही रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.