IPL मधून जखमी म्हणून माघार घेणे मिशेल स्टार्कला पडू शकते भारी, वकिलांच्या म्हणण्यानंतर होऊ शकते 1.53 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान
मिशेल स्टार्क (Photo Credit: Getty Images)

ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कविरुद्ध (Mitchell Starc) आयपीएल (IPL) टीम कोलकाता नाईट रायडर्सकडून (Kolkata Knight Riders) पैसे घेतल्याबद्दल मोठा खटला दाखल करण्यात आला होता. शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्सने 2018 आयपीएल लिलावात तब्बल 1.8 दशलक्ष डॉलर्सच्या किमतीत ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाला विकत घेतले होते. तथापि, दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी दौर्‍यादरम्यान स्टार्कला दुखापत झाली ज्यामुळे नंतर त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर त्याने दुखापती अपेक्षेनुसार नसल्याची नोंद केल्याने त्याला पैसे मिळायला हवेत. पण आता हे सर्व आता स्टार्कवर भारी पडताना दिसत आहे. स्टार्कवर विरोधी पक्षाच्या वकिलांनी केलेले आरोप खरे ठरल्यास ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला 1.53 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. (IPL 2020: एमएस धोनीचं टीम इंडियात कमबॅक आयपीएलमधील कामगिरीवर अवलंबून, टी-20 लीग यावर्षी रद्द झाल्यास काय होईल, घ्या जाणून)

टीम कोलकाता नाईट रायडर्सच्या वकिलांनी आता असा दावा केला आहे की स्टार्कला त्या दुखापतीविषयी आधीच माहिती होती. त्यानंतरही तो दक्षिण आफ्रिका मालिकेत खेळला. ज्यामुळे त्याची दुखापती वाढली आणि त्याला संपूर्ण आयपीएल हंगामातून त्याला बाहेर पडावे लागले. जर कोलकाताच्या वकिलाने हे सिद्ध केले तर स्टार्कला 1.53 दशलक्ष डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागेल. आयपीएल 2018 नंतर त्याला कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमने त्याला रिलीज केले होते. यानंतर त्याने 2019 च्या हंगामात भाग घेतला नव्हता. शिवाय, आयपीएल 2020 च्या लिलावातूनही त्याने नाव सबमिट केले नाही. त्याचा सहकारी वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याला स्टार्कच्या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा झाला कारण नाईट रायडर्सने त्याला तब्बल 15.5 कोटी रुपयांत खरेदी केले.

यापूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून स्टार्सने असे म्हटले आहे की 10 मार्च 2018 रोजी ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकामधील दुसर्‍या कसोटी सामन्यात त्याच्या दुखापतीची समस्या सुरू झाली. ऑस्ट्रेलियन संघाचे डॉक्टर रिचर्ड शॉ यांनीदेखील याची पुष्टी केली.