AUS Team (Photo Credit - X)

Australia National Cricket Team vs India National Cricket Team: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून खेळला गेला. दोन्ही संघांमधला दुसरा सामना ॲडलेडच्या ॲडलेड ओव्हलवर खेळला गेला. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा दहा गडी राखून पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हातात आहे. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे.

19 धावांचे मिळाले होते लक्ष्य

दुसऱ्या डावात माफक लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने कोणतेही विकेट न गमावता अवघ्या 3.2 षटकांत हे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर नॅथन मॅकस्विनीने सर्वाधिक नाबाद 10 धावा केल्या. नॅथन मॅकस्विनीशिवाय उस्मान ख्वाजाने नाबाद नऊ धावा केल्या. मालिकेतील तिसरा सामना शनिवारपासून म्हणजेच 14 डिसेंबरपासून गाबा, ब्रिस्बेन येथे भारतीय वेळेनुसार पहाटे 5.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाची नजर मालिकेत पुनरागमनाकडे असेल.

याआधी दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची पहिल्या डावात निराशाजनक सुरुवात झाली आणि सलामीवीर यशस्वी जैस्वाल खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी मिळून डाव सांभाळला. पहिल्या डावात संपूर्ण भारतीय संघ 44.1 षटकात 180 धावांवरच मर्यादित राहिला. युवा अष्टपैलू नितीश रेड्डीने टीम इंडियासाठी सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. नितीश रेड्डीशिवाय केएल राहुलने 37 धावा केल्या.

दुसरीकडे, अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियन संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. मिचेल स्टार्कशिवाय स्कॉट बोलँड आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी दोन गडी बाद केले. टीम इंडिया या सामन्यात पुनरागमन करू इच्छित आहे.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ 87.3 षटकात 337 धावा करत सर्वबाद झाला होता. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 157 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 140 धावांची खेळी खेळली. या शानदार खेळीदरम्यान ट्रॅव्हिस हेडने अवघ्या 141 चेंडूत 17 चौकार आणि चार षटकार ठोकले. ट्रॅव्हिस हेडशिवाय मार्नस लॅबुशेनने 64 धावा केल्या.

दुसरीकडे जसप्रीत बुमराहने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी सर्वाधिक चार विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्याशिवाय आर अश्विन आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा दुसरा डाव 36.5 षटकांत अवघ्या 175 धावांत संपला. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला फक्त 19 रन्सचं टार्गेट दिलं आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 66 धावांवर संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. टीम इंडियाकडून नितीश रेड्डी यांनी सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली.

नितीश रेड्डीशिवाय शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी 28-28 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियन संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ५ बळी घेतले. पॅट कमिन्सशिवाय स्कॉट बोलंडने तीन बळी घेतले.