AUS vs AFG (Photo Credit - Twitter)

AUS vs AFG ODI Series 2023 Cancel: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी (12 जानेवारी) अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतून आपले नाव मागे घेतले. तालिबानच्या महिला आणि मुलींवरच्या वाढत्या निर्बंधांचा निषेध म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, त्यांना अफगाणिस्तानसोबत खेळणे (AFG vs AUS) शक्य नाही. ऑस्ट्रेलिया मार्चमध्ये युएई मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार होती, जी आयसीसी सुपर लीगचा देखील एक भाग आहे. ऑस्ट्रेलिया सरकारसह इतर भागधारकांशी चर्चा केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. (हे देखील वाचा: IND vs SL ODI Series: टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने इशान किशनबद्दल केलं मोठं वक्तव्य, म्हणाला- युवा फलंदाजाची वेळ येईल)

एका निवेदनात म्हटले आहे की, 'क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निर्णय घेतला आहे की ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील पुरुषांची एकदिवसीय मालिका मार्च 2023 मध्ये खेळता येणार नाही. तालिबानने महिला आणि मुलींच्या शिक्षणावर आणि रोजगारावर आणि पार्क्स आणि जिममध्ये त्यांच्या प्रवेशावर निर्बंध लादल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. जगभरातील पुरुष आणि महिलांमध्ये खेळाच्या विकासासाठी CA समर्थन करत आहे.

तालिबानने महिलांना विद्यापीठात जाण्यास घातली बंदी 

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने महिलांना विद्यापीठात जाण्यास आणि एनजीओमध्ये काम करण्यास बंदी घातली आहे. अफगाणिस्तान हा आयसीसीचा एकमेव पूर्ण सदस्य देश आहे ज्याकडे महिला संघ नाही आणि शनिवारपासून (14 जानेवारी) सुरू होणाऱ्या महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार नाही.

अफगाणिस्तानातील ताज्या घडामोडी चिंताजनक 

आयसीसीचे सीईओ ज्योफ अल्लार्डिस यांनी महिला क्रिकेटसाठी अफगाणिस्तानची बांधिलकी नसल्याबद्दल सांगितले की पुढील आयसीसी बोर्डाच्या बैठकीत यावर चर्चा केली जाईल. ते म्हणाले, अफगाणिस्तानातील ताज्या घडामोडी चिंताजनक आहेत. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. याबाबत बोर्ड पुढील बैठकीत चर्चा करेल. अफगाणिस्तानला देण्यात येणार्‍या या मालिकेत सहभागी न झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला 30 स्पर्धा गुण गमवावे लागणार आहेत. बरं काही फरक पडत नाही कारण ऑस्ट्रेलियाने यावर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे.