IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर David Warner दुसऱ्या कसोटीत होऊ शकतो संघाबाहेर, 'या' खेळाडूला मिळू शकते संधी
डेविड वॉर्नर (Photo Credit: PTI)

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने (Team India) एक डाव आणि 132 धावांनी सामना जिंकुन मालिकेत 1-0 अशी अघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण संघाचा दुसरा डाव अवघ्या 91 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलिया संघासाठी मालिकेत पुनरागमन करणे अजिबात सोपे नसेल. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 चा दुसरा सामना 17 मार्चपासून दिल्लीत होणार आहे. दिल्ली कसोटीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे की ऑस्ट्रेलियन संघ सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. दिल्ली कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो, ज्यामध्ये क्वीन्सलँडचा डावखुरा फिरकी गोलंदाज मॅट कुहनेमनला पहिली कसोटी खेळण्याची संधी मिळू शकते.

ऑस्ट्रेलिया संघात राखीव लेग-स्पिनर म्हणून समावेश केलेला मिचेल स्वेपसन त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मामुळे देशात परतत आहे आणि अशा परिस्थितीत कुहनेमनचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया मीडिया द एजमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ऑस्ट्रेलिया संघाच्या एका सूत्राने त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सलामीवीर डेव्हिड वॉर्नर नागपूर कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात धावा करू शकला नाही, त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले. केले जात आहे. नागपूर कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात डेव्हिड वॉर्नरने 1 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात अवघ्या 10 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. (हे देखील वाचा: WTC Final: भारताने ऑस्ट्रेलियाच्या वाढवल्या अडचणी, आता Team India अशी फायनलमध्ये पोहोचणार)

मॅट कुहनेमनला मिळू शकते संधी 

26 वर्षीय युवा गोलंदाज मॅट कुहनेमनने नुकत्याच संपलेल्या बिग बॅश लीग हंगामात चांगली कामगिरी केली होती. कुहनेमनने 18 सामन्यात 16 विकेट घेतल्या. दुसरीकडे, गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन अ संघाने श्रीलंकेचा दौरा केला तेव्हा कुहनेमनने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते. आतापर्यंत 12 प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या मॅट कुहनेमनने 34 च्या सरासरीने 32 बळी घेतले आहेत.