
IPL 2025: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये (India Pakistan War) परस्पर सहमतीने युद्धविराम झाल्यास पुढील आठवड्यात इंडियन प्रीमियर लीग 2025 पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. 10 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता भारतीय प्रमाणवेळेनुसार जाहीर झालेल्या युद्धविरामामुळे दोन्ही देश जमीन, हवाई आणि समुद्रावरील सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवतील.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएल 2025 स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव 8 मे 2025 रोजी पंजाब किंग्ज (PBKS) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना रद्द झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
स्पोर्टस्टॅकच्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात स्पर्धा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. तथापि, उर्वरित सामन्यांसाठी नवीन वेळापत्रक आणि ठिकाणे निश्चित करण्यापूर्वी बीसीसीआय सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेईल.