भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेत एक वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी म्हटले आहे की, ‘मदरसा विद्यार्थी हे आमची दुसरी संरक्षण फळी आहेत, हेत, आणि गरज पडल्यास त्यांचा उपयोग सुरक्षा यंत्रणेसाठी केला जाईल.’ हे वक्तव्य भारताने 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर आणि त्याला पाकिस्तानने दिलेल्या प्रत्युत्तराच्या पार्श्वभूमीवर आले आहे. आसिफ यांच्या या विधानाने भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायात खळबळ उडवली असून, यामुळे मदरसा विद्यार्थ्यांचे लष्करीकरण आणि दहशतवादाला प्रोत्साहन मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 9 मे 2025 रोजी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेत भारत-पाकिस्तान तणावावर चर्चा सुरू असताना, ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि त्यानंतरच्या ड्रोन हल्ल्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘मदरसा विद्यार्थी हे आमच्या देशाचे भविष्य आहेत आणि आमची दुसरी संरक्षण रेषा आहेत. गरज पडल्यास त्यांना देशाच्या सुरक्षेसाठी वापरले जाईल.’ (हेही वाचा: Indus Waters Treaty: 'सिंधू नदीचे पाणी वळविण्यासाठी बांधलेल्या कोणत्याही बांधकामावर हल्ला करू'; पाकिस्तानचे संरक्षण मंत्री Khawaja Asif यांची धमकी)
India-Pakistan Tension:
“ “If needed, we will use the students of madrasa for war, they are our second line of defence”
Pakistan Defence Minister Asif Khwaja
— Nazrana Yousufzai (@Nazranausufzai) May 9, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)