AUS W (Photo Credit - X)

India Women's National Cricket Team vs Australia Women's National Cricket Team 18th Match: 2024 आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचा 18 वा सामना (2024 ICC Women’s T20 World Cup) आज भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) खेळवला गेला. या अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 9 धावांनी पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या भारताच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. भारताला आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानच्या विजयाची आशा बाळगावी लागणार आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडला हरवल्यास भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकतो.

हरमनप्रीत कौरने शेवटपर्यंत झुंज दिली

या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने शेवटपर्यंत झुंज दिली. हरमनने सामन्यात शानदार फलंदाजी करत शानदार अर्धशतक झळकावले. हरमनप्रीतच्या फाइटने चाहत्यांची मने जिंकली. मात्र, हरमनप्रीत कौरला भारताला हा सामना जिंकता आला नाही. हरमनप्रीत कौरने 47 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाने केल्या 151 धावा 

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने रविवारी येथे आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अ गटातील सामन्यात भारताविरुद्ध आठ गडी गमावून 151 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी, पाच खेळाडूंनी दुहेरी आकडा गाठला, सलामीवीर ग्रेस हॅरिसने सर्वाधिक 40 धावा केल्या. कार्यवाहक कर्णधार ताहलिया मॅकग्रा आणि एलिस पेरी यांनी 32-32 धावा केल्या. भारताकडून रेणुका सिंग आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी दोन तर पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.