AUS vs NZ 2nd Test: 'बॉक्सिंग डे' टेस्टसाठी न्यूझीलंडच्या Playing XI मध्ये दोन बदल,टॉम ब्लंडेल करणार डावाची सुरुवात
न्यूझीलंड क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/@BlackCaps0

ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध 26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या बॉक्सिंग डे (Boxing Day) कसोटीसाठी दौऱ्यावर असणाऱ्या न्यूझीलंडने आपल्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये दोन बदलांची पुष्टी केली आहे. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) याने दुखापतीतून पुनरागमन केले आहे, टॉम ब्लंडेल (Tom Blundell) याला जीत रावल (Jeet Raval) याच्या जागी डावाची सुरुवात करण्याची संधी दिली आहे. धोकादायक बोल्टला पर्थमधील पहिली कसोटी सामन्याला दुखापतीमुळे मुकावे लागले होते. पण मेलबर्न क्रिकेट मैदानावर ब्लॅक कॅप्सच्या पहिल्या कसोटीत खेळण्यासाठी उत्साहित असलेल्या बोल्टने तंदुरुस्तीकडे परतण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता न्यूझीलंड (New Zealand) साठी टेस्ट संघात पुनरागमन केले आहे, जी संघासाठी एक मोठी आनंदाची बाब आहे. यापूर्वी, पर्थमधील मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने अष्टपैलू कामगिरी करत 296 धावांनी न्यूझीलंडचा पराभव केला आणि 3 साम्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. ब्लॅक कॅप्सचा कर्णधार केन विल्यमसनने ख्रिसमसच्या सकाळच्या दिवशी प्लेयिंग इलेव्हन निश्चित केला. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया टॉसदरम्यान प्लेयिंग इलेव्हन जाहीर करेल. (AUS vs NZ 1st Test: पर्थ कसोटीत टीम साउदी याचा आक्रामक अंदाज, जो बर्न्स याला फेकून मारला चेंडू, पाहा Video)

ब्लंडेल, न्यूझीलंडच्या मध्यम फळीतील फलंदाज, फॉर्ममध्ये असलेल्या टॉम लाथम याच्यासह डावाची सुरुवात करेल. ब्लंडेल बॅक अप विकेटकीपर आणि फलंदाज म्हणून या दौर्‍यावर आहे आणि यापूर्वी मधल्या फळीत त्याने आहे. “तो एक सकारात्मक खेळाडू आणि स्मार्ट क्रिकेटर आहे म्हणूनच तो परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे, बाहेर जाऊन त्याने त्याचा नैसर्गिक खेळ खेळणे महत्वाचे आहे, ”विल्यमसनने ब्लंडेलबद्दल पत्रकारांना सांगितले. दरम्यान, पर्थ टेस्टमध्ये न्यूझीलंडने पहिल्या डावात 166 आणि दुसऱ्या डावात फक्त 171 धावा केल्या. रावल ने मागील नऊ कसोटी सामन्यांमध्ये केवळ 7.3 च्या सरासरीने कामगिरी बजावली असून न्यूझीलंडने पर्थ येथे झालेल्या 296 धावांच्या पराभवाच्या प्रत्येक डावात फक्त एक धावा केल्या होत्या.

असा आहे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडचा संघ

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कॅप्टन), टोड एस्टल, टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, काईल जेमीसन, टॉम लाथम, हेन्री निकोलस, जीत रावल, मिशेल सॅटनर, टिम साउथी, रॉस टेलर, बीजे वॅटलिंग, नील वॅग्नर.

ऑस्ट्रेलिया संघ: डेविड वॉर्नर, जो बर्न्स, David Warner, Joe Burns, मार्नस लाबूशेन, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ट्रॅव्हिस हेड, टिम पेन (कॅप्टन/विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जेम्स पॅटिन्सन, मायकेल नेसर आणि पीटर सिडल.