AUS vs NZ: न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्स याने डेब्यू सामन्यात स्टिव्ह स्मिथ याच्यासारखी फलंदाजी करत जगाला केले चकित, पाहा Video
स्टिव्ह स्मिथ आणि ग्लेन फिलिप्स (Photo Credit: Twitter/@cricketcomau)

सिडनी (Sydney) क्रिकेट स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय टेस्टमध्ये पदार्पण करणारा न्यूझीलंडचा (New Zealand) फलंदाज ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) याची आधीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याच्यासह तुलना होत आहे. फिलिप्सने तीन सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट फलंदाजी प्रदर्शन करत झुंझार अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि मधल्या फळीतील मजबूत फलंदाज स्मिथची अद्वितीय आणि जटिल अशी फलंदाजी करण्याची पद्धत आहे.  गोलंदाजीच्या रनअपच्या वेळी फलंदाजीची सतत हालचाल करणे आणि त्यानंतर ओपन-अपची भूमिका घेणे स्मिथची वैशिष्ट्ये आहेत. स्मिथची कॉपी करणे कठीण असल्याचे जवळजवळ प्रत्येकाला वाटले तरी, ग्लेन फिलिप्सने या सर्वांचा अवमान केला आहे आणि सोशल मीडियावर लोक त्याला स्मिथचा क्लोन म्हणू लागले आहे. (Big Bash League 2019-20: पीटर सिडल याने एमएस धोनी स्टाईलमध्ये केले रनआऊट, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल Wow)

CricketAustralia.com.au ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये फिलिप्सने सिडनी क्रिकेट मैदानावर तिसऱ्या टेस्टच्या तिसर्‍या दिवशी स्मिथच्या पद्धती ‘क्लोनिंग’ करत फलंदाजी करताना दिसला. पदार्पणानंतर फिलिप्सने स्मिथच्या फलंदाजीचे केवळ क्लोन केले नाही तर त्याने फलंदाजीने स्मिथच्या प्रखर फलंदाजीचे प्रदर्शनही केले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दोन्ही फलंदाजांच्या समानतेचा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना विचारले कि "आमच्याकडे आणखी एक स्टीव्ह स्मिथ क्लोन आहे?" पाहा हा व्हिडिओ:

दरम्यान, पॅट कमिन्स याने फिलिप्सला बाद करण्यापूर्वी किवी फलंदाजाने झुंझार 52 धावा फाटकावल्या. पण, पहिले टेस्ट अर्धशतक करणे फिलिप्ससाठी कठीण होते. त्याला अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वी दोन जीवनदान मिळाले आणि जेम्स पॅटिन्सन याच्या चेंडूला नो-बॉल देत त्याला परत बोलावले गेले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर 243 धावांची आघाडी घेतली होती. मार्नस लाबूशेन याच्या 215 धावांच्या जोरावर यजमान संघाने पहिल्या डावात 454 धावा केल्या आणि नंतर किवी संघाला 251 धावांवर ऑल आऊट करत तिसऱ्या एकही विकेट न गमावता 40 धावा केल्या.