T20 Mumbai League 2019: मुंबई टी 20 लीग 2019 ला आजपासून सुरुवात झाली असून पहिला सामना Aakash Tigers MWS (ATM) विरुद्ध Triumphs Knights MNE यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) रंगणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
या लीगमध्ये एकूण 8 संघांनी सहभाग घेतला आहे. यंदा आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्न आणि इगल ठाणे टायगर्स या दोन नवीन संघांचा समावेश लीगमध्ये झाला आहे. या 8 संघांचे दोन गटात विभाजन करण्यात आले असून प्रत्येक टीममधील संघ तीन इंटर ग्रुप मॅचेस खेळतील. तर दोन इंट्रा ग्रुप मॅचेस खेळल्या जातील. त्यानंतर प्रत्येक ग्रुपमधील टॉपच्या दोन संघात सेमी फायनल होईल आणि त्यात विजयी ठरलेल्या संघांमध्ये 26 मे रोजी अंतिम सामना रंगेल. ('मुंबई T20 लीग'मध्ये अर्जुन तेंडूलकर याच्यावर आकाश टायगर्स संघाकडून 5 लाखांची बोली)
ATM Vs MNE नाणेफेक:
Triumph Knights संघाने टॉस जिंकला असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
News just in:@TriumphKnights captain @surya_14kumar has won the toss and elected to bat first in the season opener against Aakash Tigers. #EkdumMumbai
— T20 Mumbai (@T20Mumbai) May 14, 2019
पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, सुर्यकुमार यादव यांसारखे उत्तम खेळाडू मुंबई टी-20 लीगच्या दुसऱ्या सीजनमध्ये दिसतील. मात्र यंदा सर्वांचे लक्ष आकाशा टायगर्स मधून खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवर असणार आहे.