Representational Image (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान घातले असून याचा परिणाम क्रिकेटच्या खेळावरही झालेला दिसत आहे. कोरोना व्हायरसचा सर्वत्र धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh cricket Board) महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मायदेशात होणारी मुजीब 100 टी-20 चषक 2020 स्पर्धा (Mujib 100 T20 Cup 2020) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलनंतर मुजीब 100 टी-20 चषक चर्चेचा विषय ठरला आहे. कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण चीन आढळला असून या व्हायरसमुळे आतापर्यंत 3 हजार हून अधिक लोकांना आपला जीवी गमावावा लागला आहे. तर, 80 हजारांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. याच भितीमुळे बीसीबीने मुजीब 100 टी-20 चषक 2020 ही स्पर्धा पुढे ढकल्याचा निर्णय घेतला आहे.

मुजीब टी-20 चषक 2020 स्पर्धा येत्या 21 आणि 22 मार्च रोजी खेळण्यात येणार होता. परंतु, कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रभावामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मुजीब रहमान यांच्या जन्मशताब्दी स्मृतीनिमित्त खेळण्यात येणार होते. आशिया इलेव्हन संघाकडून विराट कोहलीला स्थान मिळाले होते. तसेच ख्रिस गेल, लसिथ मलिंगा हे देखील यात सहभागी होणार होते. मात्र, बीसीबीने घेतलेल्या निर्णयामुळे ही स्पर्धा रद्द होण्याची शंका निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत आहे. तसेच कोणत्याही खेळाडूला किंवा प्रेक्षकांना कोराना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून बीसीबीकडून प्रयत्न केले जात आहे. मुजीब टी-20 चषक 2020 स्पर्धेतील सामना पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करतील. परिणामी, कोरोनाग्रस्त व्यक्ती सामना पाहण्यासाठी मैदानात आल्याने कोरोना व्हायरसची इतरांनाही याचे नुकसान होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हे देखील वाचा- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर आयपीएलचे सामने रद्द होण्याची शक्यता, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

दरम्यान, बांगलादेश येथे पार पडणारी ढाका प्रेमियर लीगच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने बांगला देशच्या क्रिकेट बोर्डाने बांगलादेश आणि झिम्बॉब्वे यांच्यात होणारा टी-20 सामनाही रद्द होण्याची शक्यता वक्त केली जात आहे.