आरोग्य मंत्री राजेश टोपे (Photo Credits-ANI)

वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोनाचे जाळे आता जगभर पसरले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत चालला असून नवी प्रकरणे समोर येत आहेत. तर कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात सुद्धा एन्ट्री केली असून पुण्यात दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. तर ताज्या अपडेटनुसार आज संध्याकाळच्या वेळेस मुंबईतील दोन जणांना सुद्धा कोरोनाचे संक्रामण झाल्याची माहिती देण्यात आली असून त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये आयपीएलच्या सामान्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राजेश टोपे यांनी असे म्हटले आहे की, कोरोना व्हारसच्या सावटामुळे आज मंत्र्यांची एक बैठक झाली. त्यानुसार मुंबईत पार पडणाऱ्या आयपीएलचे सामने पुढे ढकलण्याची किंवा रद्द होण्याची शक्यता आहे. याबाबत अंतिम निर्णय उद्या घेतला जाणार असल्याचे ही राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे. तसेच कोरोना व्हायरसमुळे विधानसभा अधिवेशन पुढे ढकलले किंवा तहकूब केले जाऊ शकते.(मुंबई शहरात 2 जणांना कोरोना व्हायरस)

तर पुण्यात कोरोनाचे संक्रमण झाल्याची 8 प्रकरणे समोर आली आहेत. तसेच मुंबईत 2 जणांना कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात त्याची संख्या 10 वर पोहचली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. पण त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे. कारण नसताना गर्दी करण्याचे टाळावे असे ही आवाहन उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे.