Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

पुणे (Pune) शहरापाठोपाठ आता मुंबई (Mumbai) शहरातही कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित दोन रुग्ण आढळे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (COVID 19)  बाधित रुग्णांची संख्या आता 7 इतकी झाली आहे. मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या आधी पुणे शहरात कोरोना बाधित 5 रुग्ण आढळून आले आहेत. दुबईतून एक दाम्पत्य महाराष्ट्रात दाखल झाले. त्यांच्यासोबत कोरोना व्हायरस महाराष्ट्रात दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई शहरात कोरोना व्हायरस बाधिक रुग्णांवर उपचार करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात 56 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. गरज पडल्यास खासगी रुग्णालयातही या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. (हेही वाचा, पुणे: कोरोना व्हायरस बाधित व्यक्तिच्या कुटुंबावर सोलापूरातील गावाकऱ्यांचा बहिष्कार, सरकारच्या कारवाईकडे लक्ष)

एएनआय ट्विट

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईत कोरोना व्हायरस बाधित 2 रुग्ण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, पर्यटकांसाठी पर्यटन सहलींचे आयोजन करणाऱ्या संस्था, कंपन्यांनीही सर्व सहली (टूर्स) रद्द करायला हव्या आहे, असेही पेडणेकर यांनी म्हटले आहे. मुंबईत आढळलेले रुग्ण हे 'विणा वर्ल्ड' सोबत टूरवर गेल्याचा दावा त्यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. मुंबई शहरावर जर कोरोनाचे संकट आले तर, गरज पडल्यासाठी मुंबईच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते सर्व उपाय केले जातील असेही महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.