Asia Cup 2022: आशिया चषक UAE मध्ये खेळवला जाणार, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची माहिती
Asia Cup 2022 (Photo Credit - Twitter)

श्रीलंका क्रिकेटने (SLC) बुधवारी आशियाई क्रिकेट (Asia Cup 2022) परिषदेला माहिती दिली की, देशातील आर्थिक आणि राजकीय संकटामुळे बोर्ड आगामी आशिया कप टी-20 स्पर्धेचे आयोजन करण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे आशिया कप आता कुठे खेळवा जाणार यावर मोठा प्रश्न उभा राहिला होता. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आशिया कप 2022 आता संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये खेळवला जाईल असे बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी मुंबईत झालेल्या शिखर परिषदेच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. यापूर्वी आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत ही स्पर्धा आयोजित केली जाणार होती. आशिया चषक 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत होणार असून तो T20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. "आशिया चषक युएईमध्ये होणार आहे याचे महत्वाचे कारण म्हणजे ते एकमेव ठिकाण आहे जेथे पाऊस पडत नाही," गांगुलीने सर्वोच्च परिषदेच्या बैठकीनंतर पत्रकारांना यांची माहिती दिली

आर्थिक संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला 

श्रीलंका क्रिकेट ने बुधवारी आशियाई क्रिकेट परिषदेला कळवले की, देशातील आर्थिक आणि राजकीय संकटामुळे बोर्ड आशिया कप T20 च्या आगामी हंगामाचे आयोजन करण्याच्या स्थितीत नाही. सध्याच्या संकटामुळे (Sri Lanka Cricket) ने अलीकडेच लंका प्रीमियर लीग (LPL) चा तिसरा हंगाम पुढे ढकलला होता.

Tweet

यात सहा संघ होणार सहभागी 

27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या आशिया कप 2022 मध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत. श्रीलंका, गतविजेते भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान याआधीच स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्याचवेळी पात्रता स्पर्धेनंतर सहावा आणि अंतिम संघ निश्चित केला जाईल. हाँगकाँग, कुवेत, सिंगापूर आणि यूएई या सहा संघांच्या पात्रता स्पर्धेला 20 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. (हे देखील वाचा: IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेची तयारी सुरू, पावसामुळे टीम इंडियाने केला इनडोअर सराव)

भारत हा सर्वात यशस्वी संघ 

आशिया चषक 1984 मध्ये सुरू झाला आणि आतापर्यंत ही स्पर्धा 14 वेळा आयोजित करण्यात आली आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे, ज्याने 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे. श्रीलंकेने पाच वेळा आशिया कप ट्रॉफी जिंकली आहे आणि पाकिस्तानने दोन वेळा, श्रीलंकेने या स्पर्धेच्या 14 वेळा भाग घेतला आहे, तर भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशचे संघ 13 वेळा या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. टीम इंडिया सध्या आशिया कपची चॅम्पियन आहे.