माइकल वॉन (Photo Credit: Instagram)

Ashes 2021: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) दरम्यान होणारी हाय-प्रोफाइल अ‍ॅशेस (Ashes) 2021 मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) खेळाडूंना मोठा धक्का दिला आहे. ईसीबीने (ECB) म्हटले आहे की खेळाडूंना जवळपास चार महिन्यांपर्यंत त्यांच्या कुटुंबियांपासून दूर राहावे लागणार आहे. इंग्लंडचे माजी फलंदाज केविन पीटरसन आणि अनेकांनी या निर्णयावर टीका केली आणि म्हटले आहे की डाऊन अंडर अ‍ॅशेस मालिकेतून खेळाडूंनी माघार घेतल्यास आश्चर्य वाटणार नाही. आता क्रिकेटपटू-भाष्यकार माइकल वॉन (Michael Vaughan) यांनी देखील इंग्लंडच्या खेळाडूंना पाठिंबा दर्शविला आहे आणि त्यांनी मालिका रद्द करण्याची मागणी केली. 8 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 5-सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. (Ashes 2021-22 Schedule: इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅशेस मालिकेचे वेळापत्रक जाहीर; ब्रिस्बेनमध्ये शुभारंभ तर 26 वर्षानंतर पर्थ येथे रंगणार अंतिम सामना)

वॉन यांनी म्हटले की COVID-19 परिस्थिती आणि बायो-बबलज्यामध्ये क्रिकेट खेळलं जात आहे त्याचा विचार करून चार महिन्यांपर्यंत त्यांच्या कुटुंबियांना न पाहता राहणे संघाच्या सदस्यांसाठी कठीण होईल. डेली मेलच्या वृत्तानुसार, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर यांच्यासारख्या इंग्लंडच्या सर्व स्वरूपातील खेळाडूंना अधीक फटका बसला बसेल कारण ते भारतात टी-20 वोडल कप खेळल्यावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियासाठी रवाना होतील. वॉन यांनी ट्वीट केले की, “आज अहवाल वाचला की इंग्लंडचे क्रिकेटपटू अ‍ॅशेस मालिकेसाठी आपल्या कुटुंबियांना घेऊ जाऊ शकणार नाहीत. तसे असल्यास मालिका रद्द करावी. चार महिने कुटुंबापासून दूर राहणे अजिबात मान्य नाही.”

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, स्पर्धा अजून दूरच असल्याने या प्रश्नाच्या उपायांवर विचार केला जात आहे. दरम्यान, ब्रिटिश खेळाडूं बांग्लादेश व पाकिस्तान दौऱ्यावर देखील आपल्या कुटुंबियांना सोबत घेऊ जाऊ शकणार नाही आहेत. त्यानंतर ते ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात येणार आहेत. पुढील काही महिने इंग्लंड खेळाडू मर्यादित ओव्हर मालिकांमध्ये व्यस्त असणार आहेत. श्रीलंका आणि पाकिस्तान संघ दौऱ्यावर येणार असून 21 जुलैपासून बहुप्रतिक्षीत 'द हंड्रेड' मालिका खेळली जाणार आहे.