हेडिंगले (Headlingley) येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या अॅशेस (Ashes) सामन्याआधी ऑस्ट्रेलिया (Australia) संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण, त्यांचा फॉर्ममध्ये असलेला खेळाडू स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याला सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे. लॉर्ड्स (Lords) येथे खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या डावात जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याचा बॉल मानेला लागल्यानंतर स्मिथ मैदानावरच कोसळला होता. जखमी झाल्यानंतरही तो मैदानात उतरला होता. पण, दुसऱ्या डावात मात्र तो फलंदाजी करायला आला नाही. स्मिथ मैदानावर कोसळला तेव्हा तो वैयक्तिक 80 धावांवर खेळत होता. त्यावेळी आर्चरचा एक जबरदस्त बाऊंसर स्मिथच्या मानेवर लागला. इंग्लंडच्या जोस बटलर याने तातडीनं मैदानावर येत त्याला मदत केली. पॅट कमिंस आणि इंग्लंडचे इतर खेळाडू देखील त्याच्या मदतीस सरसावले. पण, दुदैवानं तो शतक पूर्ण करू शकला नाही. तो 80 धावांवर जायबंदी झाला होता. त्याने पुन्हा फलंदाजी करण्यात येत 12 धावांची भर घातली आणि अखेरीस 92वर आऊट झाला. (Ashes 2019: स्टिव्ह स्मिथ याच्या 'हेडलेस' GIF वर जोफ्रा आर्चरने दिली खट्याळ प्रतिक्रिया, पहा Tweet)
दरम्यान, अॅशेस मालिकेच्या पहिल्या तीन डावांमध्ये उत्कृष्ट खेळी करत स्मिथने आयसीसी टेस्ट फलंदाजांच्या क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले. याचबरोबर त्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याला तिसऱ्या स्थानावर ठकलले. अॅशेसच्या दुसऱ्या टेस्टपूर्वी स्मिथ 857 गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता आणि विलियम्सन 913 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याची ही झेप भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या अव्वल स्थानाला आव्हान देणारी ठरली आहे. कोहली 922 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, परंतु स्मिथ आणि त्याच्यातील गुणांचे अंतर केवळ 9 गुणांचे राहिले आहे.
BREAKING: Justin Langer confirms Steve Smith will miss the third #Ashes Test: https://t.co/lTsuSOPA2T pic.twitter.com/t3r9VUSepT
— cricket.com.au (@cricketcomau) August 20, 2019
दुसरीकडे, आता स्मिथ तिसऱ्या टेस्टमध्ये नसल्याचे स्पष्ट झाल्यावर दुसऱ्या सामन्यात स्मिथला बदली म्हणून खेळवण्यात आलेल्या मार्नस लाबूश्चेन (Marnus Labuschagne) याला संधी मिळते की नाही याची सर्वांना उत्सुकता असणार आहे. स्मिथच्या जागी लॉर्ड्स टेस्टमध्ये फलंदाजी करण्यास आलेला लाबूश्चेन पहिला सब्स्टिटूट ठरला.