Ashes 2019: स्टिव्ह स्मिथ याच्या 'हेडलेस' GIF वर जोफ्रा आर्चरने दिली खट्याळ प्रतिक्रिया, पहा Tweet
जोफ्रा आर्चर आणि स्टिव्ह स्मिथ (Photo Credit: @cricketcomau/Twitter)

इंग्लंड (England)-ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील दुसरा अ‍ॅशेस (Ashes) सामना अत्यंत रोमांचक राहिला. सीरिजमध्ये दोन सामन्यांनंतर ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तरी, इंग्लंड अजूनही मॅचमध्ये कमबॅक करून बरोबरी करू शकतो. पण, दुसऱ्या सामान्य ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याचा चेंडू लागला आणि तो मैदानातच पडला. आर्चरचा एक जबरदस्त बाऊंसर स्मिथला मानेवर लागला. तेव्हा पासून आर्चरची सर्वत्र चर्चा होत आहे. एकीकडे काही जाणं त्याची टीका करत आहे, तर दुसरीकडे काही लॉर्ड्स (Lords) येथे झालेल्या सामन्यात पावसाने बाधित झालेल्या सामन्यात प्रभावी पदार्पण केल्याबद्दल त्याचे कौतुक करत आहेत. (Ashes 2019: हेडिंगले टेस्टसाठी इंग्लंड संघ जाहीर; ऑस्ट्रेलियासाठी स्टिव्ह स्मिथ याची दुखापत डोकेदुखी, वाचा सविस्तर)

दरम्यान, लॉर्ड्स येथील टेस्टनंतर आर्चरने ट्विटरवर जिफ शेअर करत स्वत:ची तुलना काठी घेतलेल्या वृद्ध व्यक्तीशी केली. आर्चरच्या पोस्टला प्रत्युत्तर म्हणून, ट्विटर यूजरने "स्टीव्ह स्मिथ आज सकाळी उठतो" या कॅप्शनसह आणखी एक जीआयएफ शेअर केली. हास्यास्पद म्हणजे या जिफमध्ये हेडलेस माणूस दिसत आहे. त्याच्या चाहत्याच्या प्रतिक्रियेवर आर्चरने 'खट्याळ' म्हणत कमेंट केली. पहा आर्चरची ही खट्याळ प्रतिक्रिया:

खट्याळ

दरम्यान, आर्चर इंग्लंड संघात जेम्स अँडरसन याच्या बदली खेळत आहे. लॉर्ड्सच्या पहिल्या डावात त्याने 3 आणि दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या. पण, आर्चरची गोलंदाजी इंग्लंडला विजय मिळवून देऊ शकली नाही आणि सामना ड्रॉ झाला. आता दोन्ही संघ तिसऱ्या टेस्टसाठी हेडिंगलेच्या मैदानात आमने-सामने येतील. स्मिथला दुखापत झाल्याने त्याला एक सामन्यासाठी विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. पण, स्मिथबद्दल कोच जस्टिन लँगर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की स्मिथ आता पूर्णपणे फिट आहे आणि चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही.