इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील तिसरा अॅशेस (Ashes) सामना संस्मरणीय होती. विश्वचषकमध्ये यजमान इंग्लंडला विजय मिळवून देणाऱ्या बेन स्टोक्स (Ben Stokes) याने नाबाद 135 धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. पण, स्टोक्सऐवजी अजून एका खेळाडूने महत्वाची भूमिका बजावली आणि तो म्हणजे, 11 क्रमांकावरील खेळाडू जॅक लीच (Jack Leach). स्टोक्ससह 76 धावांची भागीदारी करणाऱ्या लीचला सध्या 'हिरो' पेक्षा कमी मानले जात नाही. एकेकाळी इंग्लंडला विजयासाठी 73 धावांची आवश्यकता होती आणि त्यांची फक्त एक विकेट शिल्लक होती. यानंतर इंग्लिश संघाने 359 धावांचे लक्ष्य गाठले. स्टोक्स आणि लीच यांच्यात 76 धावांच्या भागीदारीत स्टोक्सने 74 धावा फटकावल्या पण दुसर्या टोकाला विकेट वाचवून लीचनेही महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि आज त्यांच्या प्रत्येक बाजूचे कौतुक होत आहे. (Ashes 2019: बेन स्टोक्स याच्या धमाकेदार खेळीने तब्बल 96 वर्षांनंतर इंग्लंडने नोंदवला असा पराक्रम!)
इतकेच नाही तर स्टोक्ससुद्धा त्याचे कौतुक करुन थकला नाहीत. या विजयानंतर स्टोक्सने या मालिकेच्या अधिकृत प्रायोजक स्पेक्सेव्हर्स (Specsavers) कडे एक खास विनवणी केली. त्याच्यानंतर स्पेक्सेव्हर्सने फिरकीपटू जॅक लीचला आयुष्यासाठी विनामूल्य चष्मा देण्याची घोषणा केली. जॅक फलंदाजीदरम्यान बर्याच वेळा चष्मा साफ करताना दिसला. ट्वीटमध्ये स्पेक्सेव्हर्सनी लिहिले की, "जॅक लीचचा एजंट कोणाला माहित आहे काय?" याच्यावर स्टोक्सने स्पेस्सेव्हर्सला ट्विट करत सांगितले की, प्रायोजकांनी जॅक लीच चष्मा आजीवन द्यावे. त्यास उत्तर देताना स्पॅक्सेव्हर्सनी सांगितले की आम्ही लीचला आयुष्यभर विनामूल्य चष्मा देऊ अशी आम्ही पुष्टी करतो.
We can confirm we will offer Jack Leach free glasses for life https://t.co/7rfPBK77GS
— Specsavers (@Specsavers) August 25, 2019
लीड्समध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने एका विकेटने राखत सामना जिंकला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 179 धावा केल्या होत्या तर यजमान इंग्लंडचा पहिला डावही 67 धावांवर संपुष्टात आला. दुसर्या डावात ऑस्ट्रेलियाने 246 धावा केल्या आणि यजमानांना 359 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. यासामन्यातील विजयानंतर इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.