इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील अॅशेस (Ashes) मालिकेच्या चौथ्या कसोटीच्या तिसर्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याच्यासह गंभीर अपघात होता-होता वाचला. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याचा वेगवान चेंडू त्याच्या खासगी भागाकडे लागला. देवाच्या कृपेने रूटने आवश्यक बॉक्स (एल गार्ड) घातला होता किंवा अन्यथा त्याला गंभीर दुखापत झाली असती. पण, बॉल इतका वेगाने आला की एल गार्ड तुटला आणि रूट बराच वेळ त्याच्या गुडघ्यावर मैदानावरच बसून राहिला. तथापि, वेदना कमी झाल्यानंतर तो जागेवर उभा राहिला आणि त्याने फलंदाजी सुरूच ठेवली. सलामी फलंदाज रोरी बर्न्स यांच्यासह त्याने सामन्यात इंग्लंडला कायम राखले. (Ashes 2019: चौथ्या टेस्टमध्ये स्टीव्ह स्मिथ याचे विक्रमी अर्धशतक; विराट कोहली, ब्रायन लारा यांची बरोबरी करत केली अनेक विक्रमांची नोंद)
शुक्रवारी ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 497 धावांचा पाठलाग करताना रूट आणि रोरी बर्न्स खेळपट्टीवर होते. त्याचवेळी सामन्याच्या 39 व्या ओव्हरमध्ये स्टार्कचा 140 किमी प्रतितासचा चेंडू थेट रूटच्या एलच्या गार्डवर लागला. बॉल लागताच रूट गुडघ्यावर मैदानावरच बसला आणि बॉल त्याच्या खासगी भागाला लागल्यानंतर मैदानातील सर्व लोकांच्या हृदयाचा ठोकाच बसला. सर्वांना भीती वाटली की कदाचित रूटला गंभीर दुखापत झाली असेल. तथापि, थोड्या वेळाने रूटने उभे राहून आपला बॉक्स बदलला आणि पुन्हा खेळायला सुरुवात केली. पहा या घटनेचा व्हिडिओ इथे:
Spoken like a true fast bowler.#MichaelHolding #Ashes19 #ENGvAUS #joeroot pic.twitter.com/DWMfpGQ5uU
— Duncan Huntsdale (@duncs_h) September 7, 2019
Joe Root’s box after that blow from Mitchell Starc 😳🍒 #Ashes pic.twitter.com/kAwZvqofH5
— James Whaling (@jjwhaling) September 6, 2019
सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात चौथ्या टेस्टच्या पाचव्या आणि अंतिम दिवसाचा खेळ सुरु आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. सध्या इंग्लंडने 4 विकेट गमावून 92 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी 383 धावांचे लक्ष्य दिले आहेत. सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मालिकेत 1-1 अश्या बरोबरीत आहे. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार रूटने पहिल्या डावात 71 धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावात 0 शून्यावर बाद झाला. यंदाच्या मालिकेत रूट तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे.