ऑस्ट्रेलियाचा (Australia) फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याचे मँचेस्टर (Manchester) कसोटीच्या दुसर्या डावात शतक हुकले. स्मिथने 82 धावा केल्या, जे यंदाच्या अॅशेस (Ashes) मालिकेतील त्याची सर्वात कमी धावसंख्या आहे. जलद धावा करण्याच्या प्रयत्न करीत स्मिथने जॅक लीच याच्या चेंडूवर जोखमीचा शॉट खेळला आणि आपली विकेट गमावून बसला. असे असूनही स्मिथने अॅशेसमध्ये इतिहास रचला. यंदाच्या इंग्लंडविरुद्ध टेस्ट मालिकेमध्ये स्मिथने सलग 9 व्यांदा 50 किंवा अधिक धावा केल्या आहेत. आणि ही कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज आहे. एवढेच नव्हे तर गेल्या 50 वर्षांत स्मिथ हा एकमेव खेळाडू आहे ज्याने इंग्लंडमध्ये खेळल्या जाणार्या अॅशेस मालिकेतील एका सामन्यात 250 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. स्मिथने हे काम तीन वेळा केले आहे. (Ashes 2019: डेविड वॉर्नर याने केली '0' ची हॅटट्रिक, जाणून घ्या का मैदानातून हसत बाहेर पडला)
मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या डावात डबल शतक ठोकणार्या स्मिथने दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकताच माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याची बरोबरी साधली. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावातील अर्धशतक स्मिथच्या टेस्ट करिअरमधील सलग दहावे अर्धशतक होते. पॉन्टिंगने आपल्या कारकीर्दीत 10 अर्धशतक करण्याचा पराक्रम केला होता. या यादीत दाक्षिक आफ्रिकेकेचा माजी क्रिकेटपटू जॅक कॅलिस प्रथम क्रमांकावर आहे. त्याने पहिल्या डावात 11 वेळा शतक झळकावल्यानंतर अर्धशतक ठोकले आहे. विराट कोहलीने 8 वेळा हे पराक्रम केले आहेत.
याचदरम्यान, स्मिथने अॅशेस मालिकेत तिसऱ्यांदा 600 धावा पूर्ण केल्या आहेत. विराट कोहली, ब्रायन लारा, गॅरी सोबर्स यांनीही ही कामगिरी 3-3 वेळा केली आहे. या यादीत 6 वेळा ही कामगिरी करत सर डॉन ब्रॅडमन पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान, सध्याच्या अॅशेस मालिकेच्या 5 डावात स्मिथने 671 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतके आणि 2 अर्धशतके आहेत. स्मिथची सरासरी 134.20 राहिली आहे.