Ashes 2019: स्टुअर्ट ब्रॉड याने निर्णय बदलण्यासाठी थर्ड अंपायरला  स्टंप माइकद्वारे केली विनंती, पहा Video
स्टुअर्ट ब्रॉड (Photo Credit: cricket_highlights_/Instagram)

तिसऱ्या अ‍ॅशेस (Ashes) टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने (Australia) दिलेल्या 359 पाठलाग करत असलेल्या यजमान इंग्लंडची (England) सुरुवात काही चांगली झाली नाही. दुसऱ्या डावांत इंग्लंड गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 246 धावांवर रोखले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 179 धावा केल्या आणि इंग्लंडला फक्त 67 धावांवर बाद केले. याचबरोबर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 112 धावांची अगदी मिळाली. ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावांत मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. लाबुशेनने पहिल्या डावात 74 तर दुसऱ्या डावात 80 धावा करत ऑस्ट्रेलियाला मजबूर स्थितीत पोहचवले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावादरम्यान, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याचा गोलंदाजी करतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. (Ashes 2019: डेविड वॉर्नर याला शून्यावर बाद करत स्टुअर्ट ब्रॉड याने रविचंद्रन अश्विन-जेम्स अँडरसन यांच्या विक्रमाची केली बरोबरी)

ब्रॉड मैदानात होता आणि त्याने स्टंप माइकमार्फत थर्ड अंपायरशी संवाद साधला. आता अशी विचित्र घटना तुम्ही नक्कीच कधी ऐकली नसेल. पण, तिसऱ्या अ‍ॅशेसदरम्यान ही चक्क घटना घटली. ब्रॉडने ब्रॉडने थर्ड अंपायरशी स्टम्प माइकद्वारे लाबुशेनला दिलेल्या चार धावा मागे घेण्यास सांगितले. झाले असे की, ब्रॉडने टाकलेला चेंडू लाबुशानेच्या हेल्मेटला लागून सीमारेषेच्या बाहेर गेला. अंपायरने नंतर लॅबूशेनच्या खात्यात चार धावा जोडल्या आणि हे कळताच ब्रॉडने थर्ड अंपायरला स्टंप माईकद्वारे या चार धावा मागे घेण्याची विनंती केली. ब्रॉडचे थर्ड अंपायरशी झालेले हा संवत स्टंप माईकवर रेकॉर्ड झाला. आणि सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

Broad talking to Stumps 😀

A post shared by Cricket Highlights (@cricket_highlights_) on

इंग्लंडची दुसऱ्या डावांत सलामीची जोडी रोरी बर्न्स आणि जेसन रॉय यांना चांगली सुरुवात करता आली नाही. आणि इंग्लंडची अवस्था 2 बाद 15 धावा अशी झाली. बर्न्स 7 तर रॉय 8 धावा करत माघारी परतला. त्यानंतर आलेल्या कर्णधार जो रूट आणि जो डेन्ली यांनी झुंजार अर्धशतक झळकावत शतकी भागीदारीचे योगदान दिले. यामुळे इंग्लंडच्या तिसरा सामना जिंकण्याच्या आशा जिवंत आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 359 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवशी इंग्लंडने 70 ओव्हरमध्ये 3 बाद 154 धावा केल्या होत्या.