अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि किंग कोहली (Virat Kohli) हे भारतातील अल्टीमेट कपल (Ultimate Couple) आहे. दोघही कायमचं आपल्या सोशल मिडीया अकांउटवर (Social media Account) एकमेकांसाठी रोमॉंटिक पोस्ट (Romantic Post) शेअर (Share) करताना दिसतात. आज तर काय अनुष्काचा नवरोबा म्हणजेचं किंग कोहलीचा वाढदिवस असल्याने विराटचे काही अनोखे फोटो शेअर करत एक रोमॅंटीक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माने विराट कोहलीचे काही अनोखे फोटो पोस्ट केले आहेत. हे सगळे फोटोस तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसेल असे आहेत. पहिल्या फोटोमध्ये विराट ब्लॉंकेट ओढून फक्त चेहरा दाखव बसलेला दिसत आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या फोटोत विराट डोक्यावर एक गोल कॅप आणि हातात दोन चपला धरुन उभा आहेत तर तिसऱ्या फोटोत विराट डोळे-नाक मोठे करुन मिश्कील नजरेने बघताना दिसत आहे आणि शेवटच्या व चौथ्या फोटोत विराट त्याच्या कन्यारत्न वामिकाला मांडीवर घेवून बसला दिसत आहे.
हे चारही फोटो तुम्ही कधीही कुठेही बघितलेले नसेल, बहुदा खुद्द अभिनेत्री अनुष्का शर्मानेचं जोडीदार विराट कोहलीचे हे सगळे फोटो काढले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर विराटच्या विअर्ड लुक फोटोला (Weird Look Photo) पत्नी अनुष्काने कॅप्शन (caption) दिलं आहे की तुझ्या कुठल्याही रुपावर, कृतीवर, असण्यावर माझं कायम तुझ्यावर प्रेम आहे. आज तुझा दिवस म्हणजेच वाढदिवस असल्याने मी हे खास फोटो पोस्ट करत आहे, असं अभिनेत्री अनुष्का शर्माने लिहलं आहे. (हे ही वाचा:- Happy Birthday Virat Kohli: ऑस्ट्रेलियात किंग कोहलीचा वाढदिवस दणक्यात साजरा, व्हिडीओ शेअर करत दिल्या अनोख्या शुभेच्छा)
View this post on Instagram
सध्या अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका भारतात आहे. तर विराट कोहली टी२० वर्लड कपसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. हे लव्ह बर्डस यावर्षी वाढदिवशी एमेकांपासून दूर असलेत तरी सोशल मिडीयावर अनोखी पोस्ट करत एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. किंग कोहलीने देखील बायको अनुष्काच्या या पोस्टवर स्माईली आणि हार्ट मेन्शन करत कमेंट केली आहे. तरी जगभरातून आज लाडक्या विराटवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.