Chakda Xpress: अनुष्का शर्मा 3 वर्षानंतर करणार बाॅलिवुड मध्ये कमबैक, महिला किक्रेटेर झुलन गोस्वामीच्या दिसणार भुमिकेत
Chakda Xpress, Anushka Sharma (Photo Credit - Instagram)

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) 3 वर्षानंतर बाॅलिवुड मध्ये कमबैक (Bollywood In Comeback) करणार आहे. अनुष्का शर्माने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर 'चकदा एक्सप्रेस (Chakda Xperes Tesear) टीझर शेअर केला आहे. यासोबतच चित्रपटाचे चत्रीकरण सुरू झाल्याची माहिती अनुष्काने दिली आहे. हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) यांच्या आयुष्यावर प्रेरित आहे. आणि तो Netflix वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान महिला गोलंदाजांपैकी एक असलेल्या झुनल गोस्वामीच्या गौरवशाली प्रवासाबद्दल सांगेल. अनुष्का शर्मा आणि तिचा भाऊ कर्णेश शर्मा यांनी चकदा एक्सप्रेसची निर्मिती केली आहे. तेसच चित्रपटाचे दिग्दर्शन प्रोसित रॉय करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 

चित्रपटाच्या टीझर मध्ये अनुष्का शर्मा भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसमध्ये असून ती बंगाली बोलताना दिसत आहे. भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामी हिला जगभरातील लोक चकदा एक्सप्रेस या नावाने ओळखतात. या नावावरूनच चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले आहे.

टीझर पाहताच अनुष्काला केलं नेटकऱ्यांनी टौल

चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे तर काही नेटकऱ्यांना हा आवडलाच नाही. अनुष्काचा ना रंग, ना तिची उंची आणि ना ही तिची बंगाली भाषा ही झुलन गोस्वामींसारखी आहे, असे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. (हे ही वाचा Rajkummar Rao च्या नावावर कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्याची योजना; अभिनेत्याने दिला बनावट ईमेलविरुद्ध इशारा.)

काही लोकांना असे म्हटले आहे की चित्रपटात खरेपणा वाटत नाही. तसेच हा चित्रपट अनुष्का फ्लॉप करणार. हिच्या जागेवर झुलनला यांना घेतल असतं तर त्यांनी अभिनयपण चांगला केला असता. अश्या अनेक कमेंटवरुन अनुष्का शर्माला टौल केलं जात आहे.