Sri Lanka Tour of Pakistan 2019: पाकिस्तानविरुद्ध टेस्ट मालिकेसाठी श्रीलंका संघ जाहीर; अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल यांचे पुनरागमन
श्रीलंका-पाकिस्तान संघ (Photo Credit: Getty Images)

दहा वर्षांच्या दीर्घ अंतरानंतर कसोटी क्रिकेट पाकिस्तान (Pakistan) मध्ये परतणार आहे. श्रीलंका (Sri Lanka) संघ पुढील महिन्यात पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यासाठी तयारी सुरू केली आहे. आणि आता श्रीलंका बोर्डाने आगामी टेस्ट मालिकेसाठी 16-सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. श्रीलंका संघ 8 डिसेंबरला पाकिस्तानसाठी रवाना होईल. पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये 2 सामन्यांची टेस्ट मालिका खेळली जाईल. दोन्ही संघात होणारी टेस्ट मालिका आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत खेळली जाणार आहे. श्रीलंका संघाने यापूर्वी पाकिस्तानमध्ये कसोटी खेळण्यास नकार दिला होता, शारजाहमध्ये कसोटी मालिका खेळली जावी अशी त्यांची इच्छा होती. पण, पाकिस्तान बोर्डाने ही अट ठेवली की मालिकेला निम्मा भार श्रीलंका बोर्डाने उचलावा किंवा मालिका पाकिस्तानमध्ये खेळावी.

अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) आणि दिनेश चंडिमल (Dinesh Chandimal) यांचे संघात पुनरागमन झाले आहे, तर दिमुथ करुणरत्ने संघाचे नेतृत्व करेल. ऑगस्टमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळलेल्या श्रीलंका संघात केवळ एक बदल झाला आहे. कसून रजिथा याने लेगस्पिनर अकिला डानंजया याची जागा घेतली आहे. दोन्ही देशांदरम्यानची पहिली कसोटी 11 डिसेंबरपासून रावळपिंडी येथे सुरू होईल आणि त्यानंतर दुसरी कसोटी 19 डिसेंबरपासून सुरू होईल. 2009 मध्ये लाहोर दहशतवादी हल्ल्यानंतर, ज्यात श्रीलंकेचे अनेक क्रिकेटपटू आणि सहाय्यक कर्मचारी कित्येक जखमी झाले होते, देशात पहिल्यांदा टेस्ट मालिका आयोजित करणार आहे. यापूर्वी, दोन्ही संघात वनडे आणि टी-20 मालिका झाली होती. 3 सामन्यांची वनडे मालिका पाकिस्तानने 2-0, तर टी-20 मालिकेत 3-0 ने क्लीन-स्वीप करत नंबर एक संघ पाकिस्तानला जोरदार दणका दिला.

असा आहे श्रीलंकेचा टेस्ट संघ: दिमुथ करुणारत्ने (कॅप्टन), ओशदा फर्नांडो, कुसल मेंडिस, एंजेलो मैथ्यूज, दिनेश चंडीमल, कुसल जनिथ परेरा, लाहिरु थिरिमाने, धनंजया डी सिल्वा, निरोशन डिकवेला, दिलरुवान परेरा, लसिथ एम्बुलदेनिया, सुरंगा लकमल, लाहिरु कुमारा, विश्व फर्नांडो, कसुन राजिथा आणि लखन संदकन.