RR vs DC (Photo credit - X)

DC vs RR IPL 2025 32nd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 32 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामात, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत एकूण पाच सामने खेळून एक पराभव पत्करला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले तर चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. (हे देखील वाचा: TATA IPL 2025 Points Table Update: कोलकाताचा पराभव करुन पंजाब किंग्जने घेतली मोठी झेप, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल)

हेड टू हेड आकडेवारी (DC vs RR Head To Head In IPL)

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 29 सामने खेळले गेले आहेत. राजस्थान संघाने 15 सामने जिंकले आहेत तर दिल्लीने 14 वेळा विजय मिळवला आहे. गेल्या 5 सामन्यांमध्येही राजस्थानने वरचढ कामगिरी केली आहे. राजस्थानने 3 सामने जिंकले आहेत तर दिल्लीने 2 सामने जिंकले आहेत. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ 9 वेळा एकमेकांसमोर आले आहेत, ज्यामध्ये डीसीने 6 वेळा विजय मिळवला आहे. तर, राजस्थानला फक्त 3 वेळा विजय मिळवता आला आहे.

किती वाजता सुरु होणार सामना?

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आयपीएल 2025 चा 32 वा सामना बुधवार, 16 एप्रिल रोजी खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार टॉसच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता मैदानावर असतील.

कुठे पाहणार लाईव्ह सामना?

भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्क तसेच स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर टीव्हीवर DC विरुद्ध RR आयपीएल 2025 चा 32 वा सामना थेट पाहू शकतील. येथे वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचन ऐकण्यासाठी उपलब्ध असेल. तसेच सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही JioHotstar वर पाहू शकाल. येथे तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये समालोचन ऐकायला मिळेल.