Punjab Kings vs Kolkata Knight Riders: आयपीएल 2025 च्या 31व्या सामन्यात, पंजाब किंग्ज म्हणजेच पीबीकेएस संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (PBKS vs KKR) चमत्कार केला. पंजाबने एका रोमांचक कमी धावसंख्येच्या सामन्यात कोलकात्याचा 16 धावांनी पराभव करून नवा इतिहास रचला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर यजमान पंजाब संघाचा डाव फक्त 111 धावांवर कोसळला. पंजाबचा एकही फलंदाज सातत्यपूर्ण खेळू शकला नाही. प्रभसिमरनने सर्वाधिक 30 धावांचे योगदान दिले. कोलकाताकडून हर्षित राणाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच वेळी, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. पंजाबच्या 111 धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाता 15.1 षटकात 95 धावांवर ऑलआउट झाला. अशाप्रकारे, पंजाबने आयपीएलमधील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करण्याचा मोठा पराक्रम केला. यानंतर आता पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. पंजाबने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर कोलकाताने सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, गुजरात पहिल्या, दिल्ली दुसऱ्या आणि बंगळुरु तिसऱ्या स्थानावर आहे.
IPL 2025 POINTS TABLE. 📈
- The Holy Trinity reunites at No.2, No.3 and No.4. 🔥 pic.twitter.com/21tixcofff
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 15, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)