नाताशा आणि हार्दिक पांड्या (Photo Credits-Instagram)

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने रविवारी चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का देत लॉकडाउनमध्ये लग्न आणि पत्नी नताशा स्टॅन्कोविच (Natasa Stankovic) गर्भवती असल्याचे जाहीर केले. हार्दिक-नताशाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करून आपल्या खाजगी आयुष्याबाबत माहिती दिली. यामध्ये हार्दिक-नताशाच्या लग्नाचाही फोटो आहे. यापूर्वी 2020 च्या सुरुवातीला हार्दिकने सर्वांना चकित करून दोघांचे रिलेशनशिप जाहीर केले होते. हार्दिक एका मुलाखतीत नताशाला पहिल्यांदा कसा भेटला आणि काही दिवसांच्या डेटिंगनंतर, 31 डिसेंबर 2019 रोजी साखरपुडा करण्याचा निर्णय कसा घेतला याचा किस्सा सांगितलं. यूट्यूब लाइव्हवर क्रिकेट भाष्यकार आणि पत्रकार हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांच्याशी बोलताना हार्दिक म्हणाला की, पालकांनाही त्यांच्या साखरपुड्याची कल्पना नव्हती. हार्दिकने दुबईमध्ये भाऊ कृणाल, त्याची पत्नी पंखुरी आणि अन्य उपस्थितांसमोर साखरपुडा केला. “माझ्या आईवडिलांनाही माहित नव्हते की मी साखरपुडा केला. साखरपुड्याच्या दोन दिवसांपूर्वी, मी कृणालला सांगितले. मला माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे जिच्यावर मी प्रेम करतो आणि मी मला लग्न करायचे आहे. त्यांनी (कुटुंबियांनी) मला पाठीशी घातले आणि म्हटले तुला जे पाहिजे ते कर,” हार्दिक म्हणाला. (Natasa Stankovic Pregnant: हार्दिक पांड्या-नताशा स्टॅन्कोविच यांनी दिली Good News, पण यूजर्सनी 11 आठवड्यांपूर्वी वर्तवला होता Pregnancy चा अंदाज? पाहा प्रतिक्रिया)

यानंतर हार्दिकने नताशासोबत पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. जेव्हा भोगले यांनी हार्दिकला नताशाबद्दल आणि ती तिची फॅन आहे का याबद्दल विचारले तेव्हा हार्दिक म्हणाला की तो कोण आहे याची तिला कल्पना नव्हती. “पहाटे 1 वाजता तिने एक व्यक्तीला टोपी, चेन, घड्याळ घातलेले पहिले. तेव्हा तिला वाटलं की, अलग प्रकार का आदमी आया.” हार्दिक म्हणाला त्यांनतर आम्ही भेटत राहिलो, डेटिंग करू लागलो आणि 31 डिसेंबरला साखरपुडा केला.

दुसरीकडे, हार्दिक क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. मागील वर्षी वर्ल्ड कप सामन्यानंतर हार्दिकने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. वर्ल्ड कपमध्ये पाठीच्या दुखापतीमुले त्याला टूर्नामेंटच्या मधून माघार घ्यावी लागली, त्यानंतर लंडनमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता दुखापतीतून सावरलेला हार्दिक लवकरच भारतीय संघात पुनरागमन करण्यास उत्सुक आहे.