Natasa Stankovic Pregnant: हार्दिक पांड्या-नताशा स्टॅन्कोविच यांनी दिली Good News, पण यूजर्सनी 11 आठवड्यांपूर्वी वर्तवला होता Pregnancy चा अंदाज? पाहा प्रतिक्रिया
भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि गर्लफ्रेंड नताशा स्टॅन्कोविच यांनी ते लवकरच आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी रविवारी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली. परंतु आपण हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की तब्बल 11 आठवड्यांपूर्वी चाहत्यांनी नताशाच्या गर्भधारणेबद्दल अंदाज लावला होता.
सर्वांना चकित करत भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि गर्लफ्रेंड नताशा स्टॅन्कोविच (Nataša Stanković) यांनी ते लवकरच आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी रविवारी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली. दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट केले आणि गोड बातमी शेअर केली. या फोटोंपैकी त्याने एका फोटोमध्ये हार्दिकने लॉकडाउन असताना घरच्या घरी लग्न केल्याचा फोटो शेअर केला, पण त्याबद्दल त्याने माहिती दिली नाही. हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा हिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये नताशा गरोदर असून हार्दिकने अगदी प्रेमाने तिच्या पोटाजवळ हात धरून ते दोघे आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली. परंतु आपण हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की तब्बल 11 आठवड्यांपूर्वी चाहत्यांनी नताशाच्या गर्भधारणेबद्दल अंदाज लावला होता. त्यांना अंदाज कसा आला? अधिक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा. (भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या होणार पिता; सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आनंदाची बातमी)
यंदा 10 मार्च रोजी होळीच्या निमित्ताने हार्दिकने कुटुंबासोबत फोटो शेअर करून त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. या खास दिवशी जोडप्याने पारंपारिक वेशभूषेत पांढरे शुभ्र कपडे घातलेले दिसले. नताशाने सैल चुडीदार परिधान केला होता. हा फोटो पाहिल्यानंतर काही चाहत्यांनीती कदाचित गर्भवती असल्याचा अंदाज वर्तवला होता. तिचा पोश्चर आणि सैल कपडे पाहून चाहत्यांमध्ये शंका निर्माण झाली.
पाहा हार्दिक-नताशाचे होळी 2020 फोटो
या फॅनने 11 आठवडे पूर्वी टिप्पणी दिली होती

आणखी फॅनचा अंदाज

आणखी एका फॅनला आली होती शंका

ज्यांनी अंदाज वर्तवला त्यांना त्यांची भविष्यवाणी बरोबर झाली असल्याचे माहित पडून नक्की आनंद झाला असेल! दरम्यान, 2020 च्या सुरुवातीला हार्दिक आणि नताशाने दुबईमध्ये साखरपुडा करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. हार्दिकने गोड बातमी शेअर करताना लिहिले की, "मी आणि नताशा आमच्या सहजीवनाचा प्रवास उआनंदाने करत आहोत आणि आता तो प्रवास अजूनच आनंददायी होणार आहे. नताशा गरोदर असून आता आम्हा दोघांत लवकरच तिसरा जीव येणार आहे. आम्ही या नव्या पाहुण्यासाठी खूप उत्सुक आहोत. याचसोबत तुम्हा साऱ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहोत," असेही त्याने कॅप्शनमध्ये नमूद केले.
(The above story first appeared on LatestLY on Jun 01, 2020 01:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

