भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती बरखास्त केली आहे. यासोबतच बोर्डाने निवडक पदासाठी नवीन अर्जही मागवले आहेत. यासाठी मंडळाने काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. याअंतर्गत अर्जाची प्रक्रिया पुढे जाईल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. आता कोणते माजी क्रिकेटपटू यासाठी अर्ज करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बीसीसीआयने जाहीर केल्यानंतर एका चाहत्याने भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राला (Aakash Chopra) निवडकर्ता पदासाठी अर्ज करण्यास सांगितले.
मिलन नावाच्या सोशल मीडिया यूजरने ट्विटमध्ये लिहिले - आकाश तुम्ही अर्ज करू शकता. समालोचन करताना तुम्ही जे काही मुद्दे सांगाल ते तुम्ही संघ निवडताना लक्षात ठेवू शकता आणि त्या आधारे तुम्ही एक चांगला संघ निवडू शकता. (हे देखील वाचा: R Ashwin on Ravi Shastri: अश्विनने घेतला रवी शास्त्रींचा क्लास, व्हीव्हीएस लक्ष्मणला प्रशिक्षक बनवण्याचे सांगितले कारण)
It will be an honour to get this responsibility someday. But not right now. Not for me 😇 https://t.co/NfnwmLpA6y
— Aakash Chopra (@cricketaakash) November 19, 2022
यावर आकाशनेही त्या यूजरला रिप्लाय दिला. त्याने लिहिले- हे पद मिळणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. मात्र, यासाठी मी आता अर्ज करणार नाही, तर कधीतरी अर्ज करणार आहे. सध्या हे पद माझ्यासाठी नाही. डिसेंबर 2020 मध्ये चेतन शर्माला निवड समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले. यामध्ये चेतन व्यतिरिक्त सुनील जोशी, हरविंदर सिंग, देबाशिष मोहंती यांचा समावेश होता. टी-20 विश्वचषकात टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने निवड समिती बरखास्त केली.