Ajaz Patel's 10-wicket Haul: एका डावात 10 विकेट घेऊन इतिहास रचणाऱ्या एजाज पटेलने केले मोठे वक्तव्य, आपल्या ऐतिहासिक कामगिरीवर जाणून घ्या काय म्हणाला
एजाज पटेल (Photo Credit: PTI)

भारतीय वंशाचा न्यूझीलंड (New Zealand) फिरकीपटू एजाज पटेलने (Ajaz Patel) कसोटी क्रिकेटच्या एका डावात 10 विकेट घेत इतिहास रचला आहे. मुंबईत (Mumbai) जन्मलेल्या एजाजने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) भारताविरुद्ध सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि अंतिम कसोटीच्या पहिल्या डावात ही कामगिरी केली. एजाजने 47.5 षटकात 12 मेडन्ससह 119 धावा दिल्या आणि डावातील सर्व 10 विकेट घेतल्या. एजाजपूर्वी भारताचा अनिल कुंबळे (Anil Kumble) आणि इंग्लंडच्या जिम लेकर यांनी एका डावात 10 विकेट घेतले होते. कसोटी क्रिकेटच्या एका डावात 10 विकेट घेत इतिहास रचल्यानंतर पटेलने मोठे वक्तव्य केले आहे. इथे मुंबईत जन्म घेणं आणि त्यानंतर परत येणं आणि त्यानंतर असा पराक्रम करणं माझ्यासाठी खूप खास असल्याचं त्याने म्हटलं आहे. (Ajaz Patel's 10-wicket Haul: एजाज पटेलचे 10 विकेट्सच्या क्लबमध्ये जंबो Anil Kumble कडून ‘स्वागत’, अशा शब्दात ऐतिहासिक खेळीचे केली कौतुक)

पटेल म्हणाला की मुंबईतील पहिल्या सामन्यात सर्व 10 विकेट घेणारा कसोटी इतिहासातील तिसरा गोलंदाज बनण्यासाठी “तारे संरेखित” झाले आहेत. एजाजचा जन्म मुंबईत झाला आणि तो आठ वर्षांचा असताना त्याचे कुटुंब न्यूझीलंडला स्थायीय झाले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी एजाझने चार विकेट आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी सहा विकेट घेतल्या. “माझ्यासाठी आणि फक्त माझ्यासाठीच नाही तर माझ्या कुटुंबासाठी हा एक विशेष प्रसंग आहे. दुर्दैवाने माझ्यासाठी, ते कोविडमुळे येथे नाहीत,” एजाज दुसऱ्या सत्राच्या समाप्तीनंतर म्हणाला. “प्रामाणिकपणे, हे खूपच अवास्तविक आहे, मला वाटत नाही की तुम्ही असे काहीतरी साध्य कराल यावर तुमचा कधी विश्वास असेल तर माझ्या कारकिर्दीत हे करणे खूप खास आहे. मला वाटते की मी खूप भाग्यवान आहे. स्टार्स माझ्यासाठी असा प्रसंग मुंबईत मिळावा म्हणून संरेखित केले आहे. इथे जन्म घेणं आणि इथे परत येणं हे खूप खास आहे. मी कुंबळे सरांच्या सहवासात आहे.”

पटेलने आपल्या एका षटकात भारताचे सर्वात ज्येष्ठ फलंदाज विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांना शून्यावर माघारी धाडलं होतं. 33 वर्षीय फिरकीपटू एजाजचा जन्म मुंबईत झाला आणि वयाच्या आठ वर्षापर्यंत तो मुंबईतील जोगेश्वरी राहायचा. 1996 मध्ये तो वडील युनूस पटेल आणि आई शहनाज पटेल यांच्यासोबत न्यूझीलंडला स्थायिक झाले.