Kedar Jadhav (Photo Credits: Twitter)

दक्षिण आफ्रिका त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया आणि आता विश्वचषकाच्या साखळी सामन्यात भारत उद्या (13 जून) न्यूझिलंड संघासोबत लढणार आहे. सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकपच्या सामन्यांवर ढगाळ वातावरणामुळे पावसाचं सावट आहे. अशात टीम इंडियामध्ये सहभागी असलेल्या मराठमोळ्या केदार जाधवने (Kedar Jadhav) पावसाला महाराष्ट्रात जाण्याची विनंती करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. IND vs NZ, ICC Cricket World Cup 2019: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे सावट 

 केदार जाधव

मीडियाशी बोलताना केदारने 'जा रे जा रे पावसा.. तुझी महाराष्ट्रात जास्त गरज आहे इथे नाही' अशी एक क्लिप व्हायरल होत आहे. महराष्ट यंदाही दुष्काळाने होरपळत आहे. त्यामध्ये वायू चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीवर घोंघावत असल्याने महाराष्ट्रात मान्सून लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी शेतकरीदेखील चिंतेत आहे.

भारत विरूद्ध न्युझिलंड हा भारताचा तिसरा साखळी सामना 13 जूनला इंग्लंडमध्ये ट्रेंटब्रीज, नॉटिंगहॅम येथे होणार आहे.