वनडे मालिकेत 3-0 ने व्हाईट वॉशिंग केल्यानंतर आता टीम इंडिया आता 27 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी (IND vs NZ T20 Series) मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाचे नेतृत्व अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) असेल तर मिचेल सँटनर न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करेल. वरिष्ठ खेळाडूच्या अनुपस्थितीत दोन्ही संघ मैदानात उतरतील. टीम इंडियाकडे नियमित कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी फलंदाज विराट कोहलीसारखे स्टार नाहीत, तर न्यूझीलंड संघात केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदीसारखे खेळाडूही नाहीत. टी-20 मालिकेत दोन्ही संघांमध्ये हाय-व्होल्टेज लढत पाहायला मिळू शकते. (हे देखील वाचा: IND vs NZ T20 Series: टीम इंडियाला मोठा धक्का, ऋतुराज गायकवाड जखमी; टी-20 मालिकेतुन बाहेर)
टी-20 मालिकेतील पहिला सामना JSCA इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची येथे होणार आहे. गेल्या एक वर्षापासून टीम इंडिया द्विपक्षीय टी-20 मालिकेत अजिंक्य आहे. त्यानंतर रांचीमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्डही उत्कृष्ट ठरला आहे. याआधी दोन्ही संघ 22 वेळा टी-20 मध्ये आमनेसामने आले आहेत.
हेड टू हेड आकडेवारी
टीम इंडिया आणि न्यूझीलंड 22 वेळा टी-20 मध्ये आमनेसामने आले आहेत. टीम इंडियाने 12 वेळा, तर न्यूझीलंडने 9 वेळा बाजी मारली आहे. एक सामना बरोबरीत सुटला. घरच्या मैदानावर टीम इंडियाने पाचवेळा तर न्यूझीलंडने चार वेळा विजय मिळवला आहे. घराबाहेर असताना टीम इंडियाने सात वेळा तर न्यूझीलंडने तीन वेळा विजय मिळवला आहे.
टी-20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक:
27 जानेवारी - पहिला टी-20, JSCA इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स (रांची) - संध्याकाळी 7:30 वाजता
29 जानेवारी - दुसरा टी-20, भारतरत्न श्री अटल विहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम (लखनौ) - संध्याकाळी 7:30 वाजता
1 फेब्रुवारी - तिसरा टी-20, नरेंद्र मोदी स्टेडियम (अहमदाबाद) - संध्याकाळी 7:30 वाजता
दोन्ही संघ:
भारत: हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, इशान किशन (विकेटकीपर), कुलदीप यादव, जितेश शर्मा (विकेटकीपर), पृथ्वी शाॅ, शिवम मावी, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर.
न्यूझीलंड: मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), जेकब टफी, लॉकी फर्ग्युसन, बेंजामिन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल रिप्पन, हेन्री शिपले, ईश सोधी, ब्लेअर टिकनर.