IPL 2021 स्थगितीनंतर आता T20 वर्ल्ड कपवर टांगती तलवार, ‘या’ देशात खेळवण्याचा आहे पर्याय
आयपीएल ट्रॉफी, टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी (Photo Credit: Getty/IANS)

T20 World Cup 2021: कोविड-19 (COVID-19) च्या वाढत्या घटनांमुळे मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग  (Indian Premier League) 2021 पुढे ढकलल्यानंतर आता भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपवर देखील संकट वाढत जात आहे. आयपीएलच्या (IPL) निम्म्या संघात सकारात्मक घटनांमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सुरक्षित बायो-बबलच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. मात्र, भारतात टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी अद्याप पाच महिन्यांचा कालावधी बाकी आहे आणि अजून वेळ शिल्लक आहे, असं बीसीसीआयला (BCCI) वाटत आहे. बोर्डाचा असा विश्वास आहे की या स्पर्धेवर सक्तीचे निलंबन येण्याची शक्यता कमी आहे. पण टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आणि आयपीएलचे येत्या काही महिन्यात आयोजन करण्यासाठी युएई हा पर्याय असू शकतो. (IPL 2021 Suspended: आयपीएल 14 मध्ये कोण-कोण सापडले COVID-19 च्या विळख्यात, पहा युवा ते दिग्गजच खेळाडूंची संपूर्ण यादी)

आयपीएल दरम्यान आयसीसीची टीम भारत दौर्‍यावर येणार होती, परंतु महामारीमुळे त्यांनी आपला कार्यक्रम रद्द केला. गेल्या आठवड्यात बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी युएईची राखीव जागा ठेवली असल्याची पुष्टी केली होती. बीसीसीआयचे क्रीडा विकासाचे सरव्यवस्थापक धीरज मल्होत्रा यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “त्याचे (ठिकाण) युएई असेल. आम्ही आशा करतो की हे बीसीसीआय आयोजित करेल. तर ही स्पर्धा इथेच होईल आणि ते बीसीसीआय करेल.” ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-20 विश्वचषक भारतात होणार आहे. दरम्यान, जर परिस्थिती सुधारली नाही तर, बीसीसीआय पहिल्यांदा देशाबाहेर कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धा किंवा मालिका आयोजित करेल. बीसीसीआयने यापूर्वी दोनदा परदेशात आयपीएलचे आयोजन केले आहे. यापूर्वी 2009 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि 2020 मध्ये युएई येथे आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे आणि गेल्या काही दिवसांपासून साडेतीन लाख प्रकरणे येत आहेत व 3000 लोकं दगावले आहेत. यंदाही युएईमध्ये आयपीएल आयोजित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली होती, परंतु बीसीसीआयच्या एका वर्गाने ते मान्य केले नाही आणि त्याऐवजी ते भारतात आयोजित करण्याचा अखेर निर्णय झाला.