आयपीएल 14 मध्ये खेळाडू सापडले COVID-19 च्या विळख्यात (Photo Credit: PTI, Pixabay)

IPL 2021 COVID-19 Positive Players: आयपीएलच्या (IPL) बायो-बबलमध्ये 48 तासांच्या आत चार खेळाडू कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 14वा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघात होणाऱ्या 30 व्या लीग सामन्यापूर्वी केकेआर संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यावर सामना रद्द करण्यात आला होता. आणि मंगळवारी आणखी 2 खेळाडूंची सकारात्मक रिपोर्ट आल्यावर स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा कठोर निर्णय बीसीसीआयने घेतला. केकेआर, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची अद्याप पुष्टी झाली आहे. कोविड-19 पॉझिटीव्ह आढळलेल्या आयपीएल 2021 खेळाडूंची यादी पुढील प्रमाणे आहे. (IPL 2021 Suspended: COVID 19 च्या वाढत्या संकटामुळे IPL 2021 चा यंदाचा संपूर्ण सीझन रद्द)

वरुण चक्रवर्ती

केकेआर फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यंदा मोसमात 7 सामने खेळला आणि सोमवारी आरसीबीविरुद्ध सामन्यापूर्वी त्याची कोविड-19 टेस्ट सकारात्मक आली होती. लेगस्पिनरला “ग्रीन कॉरिडॉर” च्या माध्यमातून स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. या दरम्यान त्याला विषाणूची लागण होण्याची शक्यता नाकारली गेली आहे.

संदीप वारियर

30 वर्षीय संदीप वॉरियर कोविड-19 पॉझिटिव्ह आढळणारा केकेआरचा दुसरा खेळाडू ठरला. आयपीएल 2021 मध्ये केकेआरने खेळलेल्या 7 सामन्यांपैकी कोणत्याही सामन्यात वेगवान गोलंदाजाला संधी मिळाली नव्हती.

अमित मिश्रा

दिल्ली कॅपिटल्सचा (डीसी) फिरकीपटू अमित मिश्राला कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर नेमलेल्या वैद्यकीय सेवा सुविधालयात हलवण्यात आले आहे. फ्रेंचायझी मेडिकल टीम मिश्राच्या सतत संपर्कात आहे आणि त्याची सुरक्षा सुनिश्चित करत आहे.

रिद्धिमान साहा

सनरायझर्स हैदराबादचा विकेटकीपर-फलंदाज रिद्धिमान साहा मंगळवारी दिल्ली येथे मुंबई इंडियन्स (एमआय) विरुद्ध सामन्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.

चेन्नई सुपर किंग्जचे कर्मचारी

चेन्नई सुपर किंग्जचे (सीएसके) फलंदाजी प्रशिक्षक माइकल हसी कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले होते. त्यापूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी यांची देखील टेस्ट सकारात्मक आली होती. त्यानंतरच चेन्नई संघाने पुढचा सामना खेळण्यास नकार दिला होता.

तत्पूर्वी, अ‍ॅडम झांपा आणि केन रिचर्डसन यांच्यासह अनेक परदेशी खेळाडूंनी मध्यंतरी स्पर्धा सोडली आणि भारतात कोरोना व्हायरसच्या प्रकरणात झपाट्याने वाढ होत असल्यामुळे मायदेशी परतले होती. दरम्यान, आयपीएल स्थगित झाल्यामुळे आता विदेशी खेळाडूंच्या घर वापसीकडे सर्वांचे लक्ष लागून असेल कारण ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सोबतच अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर काही वेळेपुरती बंदी घातली आहे.