ऑस्ट्रेलियाचा (Australia) सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने कसोटी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारा (Brian Lara) याने केलेल्या डावातील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याच्या जवळपास होता, परंतु कर्णधार टिम पेन (Tim Paine) याने डाव घोषित केल्यामुळे वॉर्नर इतिहास रचण्यापासून वंचित राहिला. कसोटीत सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम लाराच्या नावावर आहे. वेस्ट इंडिजच्या या महान फलंदाजाने कसोटी सामन्यातील डावात नाबाद 400 धावा केल्या होत्या. वॉर्नरने पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध दुसर्या सामन्यात 335 धावा करुन लाराच्या विक्रमाच्या जवळ पोहचला होत्या, पण ऐन वेळी कर्णधार पेनने डावाची घोषणा केली. ऐतिहासिक कामगिरीनंतर 33 वर्षीय वॉर्नरला ऑस्ट्रेलियन ओपन गोल्फ स्पर्धेच्यादरम्यान वेस्ट इंडीजच्या या दिग्गज क्रिकेटपटूला भेटण्याची संधी मिळाली. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या डावात 335 धावांवर नाबाद राहणाऱ्या वॉर्नरने डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांच्या विक्रमाला मागे टाकत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावांची नोंद केली, पण हे सर्व करूनही वॉर्नर लाराचा आजवर न मोडलेला विक्रम मोडू शकला नाही. (AUS vs NZ 2019: न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर, 'या' 13 खेळाडूंच्या टीममधून कॅमेरून बॅनक्रॉफ्ट याला वगळले)
वॉर्नर आणि लाराची ऑस्ट्रेलियन ओपन गोल्फ स्पर्धे दरम्यान भेट झाली आणि वॉर्नरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करून कदाचित त्याला कॅरेबियन फलंदाजांचा विक्रम मोडण्याची संधी मिळेल, अशीही त्याने आशा व्यक्त केली. वॉर्नरने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, "'लीजेंडला भेटण्याचा राहून आनंद होतो. आशा आहे, ब्रायन लाराचा 400 धावांचा विक्रम मोडण्याची मला आणखी एक संधी मिळेल." लारानेही दोघांचा फोटो शेअर केला आणि एक रोचक कॅप्शन लिहिले. लाराने त्याच्या आणि वॉर्नरच्या धावांची एकूण संख्या लिहिली. लाराने कॅप्शनमध्ये एक खास संदेश लिहिला की, “735 नॉट आउट! डेव्हिड वॉर्नर, अभिनंदन!!”
वॉर्नरची पोस्ट
लाराची पोस्ट
View this post on Instagram
2004 मध्ये लाराने हे कामगिरी केली होती. त्यानंतर, म्हणजेच, 15 वर्षांत 12 फलंदाजांनी 300 धावांचा टप्पा ओलांडला, पण लाराच्या विक्रमाच्या जवळ कोणीही पोहोचू शकला नाही. अशा परिस्थितीत वॉर्नरचे निराश होणे योग्य आहे. कसोटी इतिहासातील लाराचा स्कोअर सर्वात मोठा आहे. मॅथ्यू हेडन 380 धावांसह दुसर्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियासाठी केलेली सर्वाधिक धावसंख्या त्याच्याच नावावर आहे.