पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या टेस्ट मालिकेत ऑस्ट्रेलियाने (Australia) प्रभावी कामगिरी केली आणि क्लीन-स्वीप मिळवला. आता ऑस्ट्रेलिया संघ 12 डिसेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची टेस्ट मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघाने नुकतंच पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध टेस्ट मालिकेत विजय मिळवला आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत कांगारू संघात एक सर्वात मोठा बदल आहे. कॅमेरून बॅनक्रॉफ्ट (Cameron Bancroft) याला वगळण्यात आले असून जेम्स पॅटिन्सन (James Pattinson) याला संघात स्थान देण्यात आले आहे. बॅनक्रॉफ्टला पाकिस्तानविरुद्ध मालिकेसाठीही संघात स्थान मिळाले नव्हते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टीम टिम पेन (Tim Paine) याच्या नेतृत्वात मुख्य कसोटी मालिकेसाठी 13 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. बॅनक्रॉफ्टच्या जागी फक्त दोन आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळणाऱ्या मायकेल नेसर याला संधी देण्यात आली आहे. 29 वर्षीय नेसरने शेफील्ड शिल्ड आणि अनेक घरगुती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. (AUS vs PAK 2nd Test: मार्नस लाबुशेन याने केली स्टिव्ह स्मिथ याची नकल, गुरुकडून शिकत आहे शिष्य म्हणाले Netizens)
या व्यतिरिक्त जेम्स पॅटिनसन याचेही संघात पुनरागमन झाले आहेत. पॅटीनसनवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नुकतंच एका सामन्यासाठी बंदी घातली होती. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार, बॅनक्रॉफ्टला स्टँडबाय खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. मालिकेदरम्यान एखादा खेळाडू जखमी झाल्यास त्याला संघात स्थान दिले जाईल. गरज भासल्यास कोणत्याही वेळी बॅनक्रॉफ्टला संघात समाविष्ट करता येईल, असे निवड समितीने म्हटले आहे. दोन्ही संघांमधील मालिका 12 डिसेंबरपासून पर्थमधील डे-नाईट कसोटीने सुरू होईल. यानंतर बॉक्सिंग डे टेस्ट 26 डिसेंबरला मेलबर्नमध्ये आणि त्यानंतर मालिकेचा शेवटचा सामना 3 जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळला जाईल.
JUST IN: Aussies announce Test squad for #AUSvNZ series: https://t.co/3UPyAfzyu9 pic.twitter.com/f7ney5O5Nl
— cricket.com.au (@cricketcomau) December 2, 2019
न्यूझीलंडविरुद्ध 13 सदस्यीय संघ खालीलप्रमाणे आहेः
टिम पेन (कॅप्टन आणि यष्टीरक्षक), जो बर्न्स, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, मायकेल नेसर, जेम्स पॅटिनसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मॅथ्यू वेड, आणि डेव्हिड वॉर्नर.