Photo Credit- X

India National Cricket Team vs England National Cricket Team:  नवीन वर्ष 2025 ची सुरुवात भारतासाठी चांगली झाली नाही. सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा विकेट राखून पराभव केला. आता भारताला नवीन वर्षात निळ्या जर्सीने टी-20 मालिकेने सुरुवात करायची आहे. भारत विरुद्ध इंग्लड टी-20 मालिका 22 जानेवारी 2025 पासून सुरू होत आहे. टीम इंडिया घरच्या मैदानावर इंग्लंडशी दोन हात करणार आहे. 2025 मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यात केवळ मर्यादित षटकांच्या सामन्यांचा समावेश असेल. दोन्ही संघ पाच टी-20 आणि तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) मध्ये आमनेसामने येतील. दरम्यान, तुम्ही भारत विरुद्ध इंग्लंड 2025 च्या संपूर्ण वेळापत्रकाची PDF फाइल येथे डाउनलोड करू शकता.

टी-20 नंतर, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर महत्वाची असणारी एकदिवसीय मालिका दोन्ही पक्ष आमनेसामने येतील. त्यामुळे, एकदिवसीय मालिकेमुळे भारत आणि इंग्लंड या दोघांनाही पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या तयारीसाठी मदत होईल.

भारत विरुद्ध इंग्लंड 2025 पूर्ण वेळापत्रक

तारीख सामना वेळ (IST) ठिकाण
22 जानेवारी 2025 पहला टी-20 07:00 PM एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
25 जानेवारी 2025 दूसरा टी-20 07:00 PM ईडन गार्डन्स, कोलकाता
28 जानेवारी 2025 तीसरा टी-20 07:00 PM सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम, राजकोट
31 जानेवारी 2025 चौथा टी-20 07:00 PM महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम, पुणे
02 फ्रेबुवारी 2025 पाचवा टी-20 07:00 PM वानखेडे स्टेडियम, मुंबई
06 फ्रेबुवारी 2025 पहला वनडे 01:30 PM विदर्भ क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम, नागपुर
09 फ्रेबुवारी 2025 दूसरा वनडे 01:30 PM बाराबती स्टेडियम, कटक
12 फ्रेबुवारी 2025 तीसरा वनडे 01:30 PM नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये भारताचे कर्णधारपद भूषवणार आहे, तर रोहित शर्मा एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. येत्या काही दिवसांत भारताच्या टी-20 आणि वनडे संघांची घोषणा होण्याची अपेक्षा आहे आणि या यादीत कोण स्थान मिळवते हे पाहणे मनोरंजक असेल. दुसरीकडे, जॉस बटलर टी-20 आणि वनडे या दोन्ही मालिकेमध्ये इंग्लंड संघाचे नेतृत्व करेल.