Ajinkya Rahane (Photo Credit - X)

Ajinkya Rahane Century County Cricket: अनेक दिवसांपासून भारतीय संघाबाहेर असलेला अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पेटला आहे. रहाणेने रविवारी कौंटी क्रिकेटमध्ये लीसेस्टरशायरकडून खेळताना शानदार शतक झळकावले. रहाणेने 19 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर क्रिकेटच्या मैदानावर शतक झळकावले आहे. रहाणेने आपल्या शतकी खेळीने भारतीय संघात पुनरागमनाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. रहाणे अजूनही संघात पुनरागमन करण्यासाठी मैदानावर आपले सर्वस्व देताना दिसत आहे. (हे देखील वाचा: England Beat Sri Lanka, 2nd Test Day 4 Scorecard: इंग्लडंकडून 'लंका'दहन, दुसऱ्या कसोटीत मिळवला 190 धावांनी विजय; मालिकेत घेतली 2-0 अशी आघाडी)

रहाणे पुनरागमनासाठी सज्ज 

अजिंक्य रहाणेने 192 चेंडूंत 13 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 102 धावांची खेळी केली. त्या वेळी रहाणे या सामन्यात फलंदाजीसाठी उतरला होता. जेव्हा त्यांच्या संघाच्या पहिल्या दोन विकेट फक्त 37 धावांवर पडल्या. येथून रहानने डावाची धुरा सांभाळत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज पीटर हँड्सकॉम्बसोबत 183 धावांची मोठी भागीदारी केली. शतकानंतर रहाणेला आपला डाव जास्त लांबवता आला नाही. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे रहाणेने 19 महिन्यांचा शतकी दुष्काळ संपवला. रहाणेने जानेवारी 2023 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये शेवटचे शतक झळकावले होते. आसामविरुद्ध त्याचे शतक झाले. या सामन्यात रहाणेने 191 धावांची मोठी खेळी केली. या खेळीनंतर रहाणेला त्याच्या बॅटने एकही मोठी खेळी खेळता आली नाही. आयपीएल 2024 मध्येही रहाणेची बॅट शांत होती.

कसा झाला सामना?

तत्पूर्वी, ग्लॅमॉर्गनच्या कॉलिन इंग्रामने नाबाद 257 धावांची खेळी केली, ज्यामुळे त्याने लंचपर्यंत 9 विकेट्सवर 550 धावा करून पहिला डाव घोषित केला होता लेस्टरशायरचा डाव 251 धावांत गारद झाला.