Aaron Finch  आणि  Virat Kohli ने  2019 वर्ल्डकप ट्रॉफीसोबत केले ऑस्ट्रेलियात केले फोटोसेशन! पहा ट्रॉफीची पहिली झलक
2019 ICC Cricket World Cup trophy (Photo Credits: Twitter/ANI )

ICC Cricket World Cup 2019Trophy: ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असलेला भारतीय क्रिकेट संघ उद्यापासून एकदिवसीय सामन्यांच्या सीरिजला सामोरी जाणार आहे. यापूर्वी टी-20 सीरीज आणि कसोटी मालिका जिंकण्याचा ऐतिहासिक विक्रम केल्यानंतर आता एक दिवसीय मालिका जिंकण्याकडे भारतीय संघाचे लक्ष आहे. यंदाच्या वर्षी 2019 चा आयसीसी  वर्ल्डकप इंग्लंडमध्ये खेळला जाणार आहे. आज ऑस्ट्रेलियामध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि  ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार अरॉन फिंच (Aaron Finch) यांनी वर्ल्डकपच्या ट्रॉफीसोबत खास फोटोसेशन केले.

वर्ल्डकप ट्रॉफीची पहिली झलक

रोहित शर्माने आज मीडियाशी बोलताना अजून वर्ल्डकपच्या संघामध्ये नेमकी कोणाची निवड होणार हे ठाऊक नसले तरीही ज्या खेळाडूंची निवड होईल त्याची चांगला परफॉर्मन्स करणं हेच लक्ष्य असेल. तसेच विराट कोहलीने देखील सध्या आमचं लक्ष आगामी वर्ल्डकपसाठी तयारी करणं हेच असे म्हटले आहे. Indian Cricket Team 2019 Schedule: नव्या वर्षात कसं असेल भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक?

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. या सामन्यांनंतर भारतीय संघ न्युझिलंडच्या दौर्‍यावर जाणार आहे.