ऑस्ट्रेलियाचा (Australia) मर्यादित षटकांचा कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch) त्याच्या उजव्या गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर बरे होण्याच्या मार्गावर आहे. बार्बाडोसहून परतल्यानंतर त्याच्या अनिवार्य दोन आठवड्यांच्या हॉटेल क्वारंटाईन कालावधीच्या पहिल्या दिवशी फिंचच्या गुढघ्यावर गुरुवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup) आता आरोन फिंचला रिकव्हर होण्यासाठी तब्बल 10 आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) दिलेल्या निवेदन जाहीर केले आणि म्हटले आहे की ऑपरेशन यशस्वी झाले आहे आणि 34 वर्षीय फिंच आता पुनर्प्राप्ती प्रक्रिया सुरू करेल ज्यात 10 आठवडे लागण्याची शक्यता आहे. भारतातून स्थलांतरित झाल्यानंतर यूएई आणि ओमानमध्ये आयोजित टी -20 विश्वचषक 17 ऑक्टोबर रोजी ग्रुप स्टेजसह सुरु होईल. (BAN vs AUS 2021: क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाइटवर बांगलादेशच्या विजयी उत्सवाचा व्हिडिओ पाहून जस्टीन लँगर संतापले; पाहा मग काय झाले)
फिंचला जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर सेंट लुसिया येथे कूर्चाची दुखापत झाली होती पण विंडीजविरुद्ध पाच टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करण्यात तो यशस्वी झाला होता. तथापि मालिकेच्या अंतिम सामन्यात पुन्हा दुखापत वाढ झाली. विंडीज दौऱ्यावरील त्या मालिकेत कांगारू संघाला 4-1 अशा पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. टी-20 मालिकेनंतर बार्बाडोसमध्ये झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांमधून फिंच बाहेर बसावे आणि त्या स्वरूपात अॅलेक्स कॅरीने कर्णधारपदाची जबाबदार सांभाळली. पथक बांगलादेशला जात असताना, फिंचच्या हॉटेल क्वारंटाईनला सुरुवात करण्यासाठी लंडन मार्गे व्यावसायिक विमानाने घरी परतला.
The race is on for the skipper after a knee operation #T20WorldCup
— cricket.com.au (@cricketcomau) August 13, 2021
सातवा टी-20 विश्वचषक कोविड-19 महामारीमुळे भारतातून हलवण्यात आला आहे आणि 17 ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे आयूजीत केला जाणार आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी कॅरीने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली होती तर मॅथ्यू वेडने बांगलादेशमध्ये आगामी टी-20 मालिकेची जबाबदारी स्वीकारली होती, ज्यात ऑस्ट्रेलियाला 4-1 ने पराभव पत्करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने अद्याप टी-20 विश्वचषक जिंकला नाही आणि विंडीज येथे आयोजित 2010 च्या आवृत्तीत अंतिम फेरीत इंग्लंडकडून पराभूत झाला होता.